एल्गार न्यूज :-
राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली असून सदरील दगडफेक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आमदार राजेश टोपे हे घनसावंगी (जि.जालना) मतदार संघाचे सध्याचे आमदार आहेत. जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुक बिनविरोध पार पडली असून यामध्ये बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड झाली आहे.
राजेश टोपे यांची गाडी (कार) दुपारी बँकेच्या खाली उभी होती, ज्यामध्ये गाडीचा ड्रायवर सुध्दा होता, सदरील गाडीवर अज्ञात लोकांनी दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या आहेत. राजेश टोपे यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.
असंतुष्ट लोकांचे काम ! – टोपे
सदरील गाडीच्या काचा फोडण्याचे काम असंतुष्ट लोकांनी केले आहे, ज्यांनी कायदा हातात घेवून हे काम केले आहे त्यांना शिक्षा व्हायला पाहीजे, या प्रकरणी पोलीसांनी योग्य ती कारवाई करावी असे आमदार राजेश टोपे यांनी सांगितले.
मराठा आंदोलकांचा संबंध नाही !
आमदार राजेश टोपे यांना या प्रकरणी मराठा आंदोलकांचा काही संबंध आहे का असे विचारण्यात आले असता, या दगडफेकीचा मराठा आंदोलकाशी काहीच संबंध नाही, हा निवडणुकीचा विषय आहे असे राजेश टोपे यांनी सांगितले.
लोणीकरांची माणसं ?
सर्वांनी मिळून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतिष टोपे यांची अध्यक्ष तर भाजपचे जावळे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड केली आहे, परंतू काही असंतुष्ट लोकांनी हा प्रकार केला आहे. आमदार लोणीकर यांच्या लोकांनी हा प्रकार केल्याचा संशयही राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.
गुन्हा दाखल !
घटनेशी संबंधित सीसीटीवी फुटेज तपासण्यात येणार असल्याचे कळते, पोलीसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी वाहन चालक यांच्या फिर्यादीवरून 10 ते 15 जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कळते.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.