एल्गार न्यूज विशेष :-
Apaar id for Students Registration : ज्या प्रमाणे देशात वन नेशन वन रेशन करण्यात येत आहेत त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी वन नेशन वन आयडी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत हे कार्ड महत्वपूर्ण ठरणार आहे.
केंद्र सरकारकडून देण्याचे येणारी ही आयडी पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी असेल, या आयडीला विद्यार्थ्याचे आधार कार्ड सुध्दा लिंक केले जाणार आहे, म्हणजेच देशात विद्यार्थ्याला कुठेही शिक्षण घ्यायचे असल्यास त्याच्या आयडी मध्ये सर्व माहिती असेल.
काय आहे अपार आयडी ?
APAAR ID हे एक प्रकारचे ओळखपत्र आहे. अपार म्हणजे Automated Permanent Academic Account Registry आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सरकारने हे एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.
या आयडी मध्ये विद्यार्थ्याचा निकाल, समग्र अहवाल, विद्यार्थ्याची शैक्षणिक माहिती, विविध क्षेत्रात केलेली कामगिरी, क्रिडा, कौशल्य प्रशिक्षण इत्यादी क्षेत्रात मिळवलेले यश अशी सर्व प्रकारची माहिती असणार आहे. One Nation One Student id करण्याचा सरकारचा उद्देश आहे.
अपार आयडीचा फायदा काय ?
- या आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्याला एका शाळेतून दुसऱ्या शाळेत किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवेश घेणे सोपे होईल.
- युनिक आयडीमुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शिक्षण घेणे शक्य होईल.
- विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास तसेच त्यांचे यश इत्यादीची माहिती असेल.
- शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती ठेवणे शक्य होईल.
- विद्यार्थ्याच्या विविध क्षेत्रातील कामगिरीची माहिती होईल.
- शासनाच्या शैक्षणिक योजना व उपक्रमांचा लाभ देणे शक्य होईल.
- शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे शक्य होईल.
- उच्च शिक्षण घेण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- रोजगाराच्या संधी मिळवण्यात सहाय्यक ठरेल.
देशात एकसमान शैक्षणिक इकोसिस्टीम आणण्याच्या उद्देशाने शासनाने अशा प्रकारचे पाऊल उचलले आहे. सदरील कार्ड आधारशी लिंक असल्यामुळे इतर राज्यातही शिक्षणासाठी गेल्यास नवीन कार्ड काढण्याची गरज भासणार नाही. याच कार्डावरील युनिक नंबर सर्वत्र कामी येणार आहे. सदरील कार्ड बनवतांना पालकांची परवानगी सुध्दा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
नियमित रोखठोक, निष्पक्ष व निर्भीड बातम्या व आर्टीकल आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.