Your Alt Text

शिंदे-फडणवीस-पवार सरकार राज्‍यातील जनतेला देणार हा लाभ ? | Anandacha Shidha for Citizens

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
राज्‍यात शिंदे – फडणवीस यांचे सरकार स्‍थापन झाल्‍यानंतर सरकार जनतेच्‍या दृष्‍टीकाोणातून विविध निर्णय घेत आहे. अनेक निर्णयांचा फायदा गोरगरीब व सर्वसामान्‍य जनतेला होत असल्‍याचे दिसून येत आहे. आता राज्‍यात शिंदे, फडणवीस आणि पवार यांचे एकत्रित सरकार आहे.

इतर राज्‍यात विविध कल्‍याणकारी योजना राबविण्‍यात आल्‍यामुळे त्‍याचा परिणाम निवडणुकांमध्‍ये दिसून आलेला आहे. आता महाराष्‍ट्रातही राज्‍य सरकार गोरगरीब व सर्वसामान्‍य जनतेला दिलासा देण्‍याच्‍या दृष्‍टीने पुन्‍हा एक निर्णय घेणार असल्‍याचे दिसून येत आहे.

रेशनकार्ड धारकांसाठी !

आता पर्यंत राज्‍य सरकारच्‍या वतीने दसरा, दिवाळी, गुडी पाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती यांच्‍या सारख्‍या सणांच्‍या निमित्‍ताने आनंदाचा शिधा देण्‍यात आला होता, या योजने अंतर्गत राज्‍यातील गरीब व गरजू रेशनकार्ड धारकांना अवघ्‍या शंभर रूपयात तेल, साखर, पोहे, दाळ या सारखे जिन्‍नस दिले जात होते.

विविध सणा निमित्‍त आनंदाचा शिधा देण्‍यात आल्‍यामुळे नागरिकांना काही अंशी काही का असेना दिलासा मिळाला होता, राज्‍यातील जनतेने या योजनेला चांगला प्रतिसादही दिल्‍याचे दिसून आले, अर्थातच ही योजना लोकप्रिय ठरल्‍याचे दिसून आले आहे.

आनंदाचा शिधा !

आगामी वर्षात लोकसभेच्‍या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. शिवाय त्‍यानंतर राज्‍यातील विधानसभेच्‍या निवडणुकीचा बिगुल देखील वाजणार आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्‍य नागरिकांना खुश करण्‍यासाठी शासन आनंदाचा शिधा वर्षभर राबवण्‍याचा निर्णय घेणार असल्‍याचे माध्‍यमांमधून समोर येत आहे.

अन्‍न व नागरी पुरवठा विभागाकडून याबाबतचा प्रस्‍ताव तयार करण्‍यात येत असल्‍याचे माध्‍यमांमधून समोर येत आहे. अंदाजित 315 रूपये किमतीचा शिधा फक्‍त 100 रूपयात पुढील एका वर्षासाठी दर महिन्‍याला देण्‍याचा प्रस्‍ताव राज्‍य सरकार समोर असल्‍याचे कळते.

याचाच अर्थ राज्‍य शासनाने सध्‍या सणासुदीच्‍या निमित्‍ताने देण्‍यात येणारा आनंदाचा शिधा पुढील वर्षभरासाठी दर महिन्‍याला देण्‍याचा विचार सुरू केला आहे. सदरील निर्णय झाल्‍यास राज्‍यातील असंख्‍य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!