Your Alt Text

जालना जिल्‍हयातील नवनिर्वाचित सर्व आमदारांनी आपापल्‍या मतदारसंघांचा सर्वांगिण विकास करून संधीचे सोने करावे !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
राज्‍यातील विधानसभा निवडणुकीत ज्‍या त्‍या मतदारसंघातून विविध पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्‍याबद्दल एल्‍गार न्‍यूजच्‍या वतीने राज्‍यातील सर्व पक्षाच्‍या विजयी उमेदवारांचे अर्थातच आमदारांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्‍छा.

जालना जिल्‍ह्यातील पाचही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत, अर्थातच जालना मतदारसंघातून अजुर्नराव खोतकर, घनसावंगी मतदारसंघातून डॉ.हिकमत उढाण, परतूर मतदारसंघातून बबनराव लोणीकर, भोकरदन मतदारसंघातून संतोष पाटील दानवे आणि बदनापूर मतदारसंघातून नारायण कुचे हे विजयी झाले आहेत. राज्‍यातही महायुतीला बहुमत मिळाले असल्‍यामुळे सदरील नवनिर्वाचित आमदारांना आपापल्‍या मतदारसंघाच्‍या विकासासाठी निधी आणणे आणि विविध योजना राबविणे अधिक सोपे होणार आहे.

fdfkjaslfkja3

सदरील आमदारांना आता 5 वर्षे जनतेची सेवा करण्‍याची संधी नव्‍हे तर सुवर्णसंधी मिळाली आहे. या 5 वर्षात आपल्‍या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्‍न तातडीने कसे मार्गी लागतील, सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या अडचणी कशा दूर होतील आणि मतदारसंघाचा सर्वांगिण विकास कसा करता येईल या दृष्‍टीने प्रयत्‍न करावे लागणार आहेत. रस्‍ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्‍य, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, महिलांचे प्रश्‍न, सर्वसामान्‍य व्‍यापारी बांधवांचे प्रश्‍न, उद्योग, रोजगार असे अनेक मुलभूत प्रश्‍न आहेत ज्‍याकडे विशेष लक्ष देणे आवश्‍यक आहे.

जालना जिल्‍ह्याच्‍या विकासाला चालना देणारे आणि रोजगार उपलब्‍ध करणारे विविध प्रोजेक्‍ट कसे आणता येईल, तसेच वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्‍न मार्गी कसे लागतील या दृष्‍टीनेही सर्व आमदारांनी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. जिल्‍ह्यातील सर्वच मतदारसंघांना शासनाचा जास्‍तीत जास्‍त निधी कसा मिळवता येईल आणि विकास कामे कसे करता येतील यासाठी सर्व आमदारांनी संयुक्‍तपणे प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे.

fdfkjaslfkja2

घनसावंगी मतदारसंघात जनतेच्‍या अपेक्षा !

घनसावंगी मतदारसंघात प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेले डॉ.हिकमत उढाण हे विजयी झाले आहेत. मतदारसंघातील जनतेने मोठ्या अपेक्षेने डॉ.हिकमत उढाण यांच्‍यावर विश्‍वास टाकून त्‍यांना पहिल्‍यांदाच आपला प्रतिनिधी म्‍हणून विधानसभेत पाठवले आहे. प्रचारादरम्‍यान त्‍यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावून मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्‍याबाबत आश्‍वासित केलेले आहे. डॉ.हिकमत उढाण हे शिवसेना महायुतीचे उमेदवार म्‍हणून विजयी झाले असून राज्‍यातही महायुतीचे सरकार स्‍थापन होत असल्‍याने त्‍यांना मतदारसंघात जलदगतीने विकास कामे करण्‍याची आणि प्रलंबित प्रश्‍न सोडवण्‍याची सुवर्णसंधी प्राप्‍त झाली आहे.

घनसावंगी मतदारसंघात आजघडीला अनेक गावे अशी आहेत जेथे रस्‍ता नाही, कुठे जलजीवन मिशन योजना अर्धवट अवस्‍थेत बंद आहे तर कुठे पाणी पुरवठा योजनाच मंजूर नाही. बहुतांश गावांमध्‍ये विजेची समस्‍या आहे. मतदारसंघात आजही चांगल्‍या दर्जाच्‍या आरोग्‍याच्‍या सुविधा नाहीत, काही आरोग्‍य केंद्र तर फक्‍त नावालाच उरली आहेत. चांगल्‍या दर्जाचे माध्‍यमिक व उच्‍च शिक्षण आणि विविध कोर्सेस उपलब्‍ध नसल्‍याने अनेक पालकांना आपल्‍या पाल्‍यांना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवावे लागत आहे.

fdfkjaslfkja1

रोजगाराचा प्रश्‍न सुध्‍दा या मतदारसंघात एक महत्‍वाचा विषय आहे. असंख्‍य युवकांना रोजगार नसल्‍याने बाहेरगावी जावे लागत आहे. उद्योग व्‍यवसायासाठी कर्ज मिळत नसल्‍याने अनेक युवक इच्‍छा असतांनाही पैशाअभावी स्‍वत:चा व्‍यवसाय करू शकत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्‍न, कामगार, कष्‍टकऱ्यांचे प्रश्‍न सुध्‍दा प्रलंबित आहेत. अशा विविध प्रश्‍नांकडे येत्‍या काळात डॉ.हिकमत उढाण यांना लक्ष द्यावे लागणार आहे.

डॉ.हिकमत उढाण यांचे वरिष्‍ठ पातळीवर नेत्‍यांशी चांगले संबंध आहेत, शिवाय प्रशासकीय अनुभव तर आहेच सोबतच प्रशासनातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांशीही योग्‍य तो संवाद साधून ते मतदारसंघात विविध विकासकामे करू शकतात आणि विविध योजना राबवू शकतात, शिवाय जिल्‍ह्यातील सर्व आमदारांचेही त्‍यांना सहकार्य लाभणार असल्‍याने कमी कालावधीत प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावू शकतात अशी जनतेची भावना आहे.

जिल्‍ह्यात मंत्रीपद !

जालना जिल्‍ह्यात महायुतीचे सर्व उमदेवार निवडून आले आहेत, त्‍यामुळे अर्थातच जिल्‍ह्याला मंत्रीपद मिळणार हे निश्चित मानले जात आहे. त्‍यामुळे ज्‍या आमदार महोदयाला मंत्रीपदाची संधी मिळणार आहे त्‍यांनी स्‍वत:च्‍या मतदारसंघासह इतर आमदारांच्‍या मतदारसंघातही विकासकामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही किंवा दुजाभाव होणार नाही याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. जिल्‍ह्यातील सर्व आमदारांनी आपापल्‍या मतदारासंघासाठी इच्‍छाशक्‍ती दाखवून सातत्‍यपूर्ण प्रयत्‍न केल्‍यास अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागतील यात शंका नाही.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!