एल्गार न्यूज :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले, तसेच या सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच संगीत शिवपुराण कथेचेही आयोजन करण्यात आले होते.
दि.21 मंगळवार रोजी सकाळी 10 ते 12 भागवताचार्य ह.भ.प. गणेशानंद महाराज शास्त्री वृंदावन यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. सदरील अखंड हरीनाम सप्ताहाची दि.21 रोजी समाप्ती होत आहे. या निमित्त महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन गांवकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
25 वे रौप्य महोत्सवी वर्ष !
कुंभार पिंपळगांव येथे दरवर्षी अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते, यंदाचे वर्ष हे 25 वे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. अर्थातच गेल्या 25 वर्षांपासून दरवर्षी हा सप्ताह आयोजित केला जातो.
सर्वांचा सहभाग !
अखंड हरीनाम सप्ताहा निमित्त गांवकरी तसेच परिसरातील गावांमधील नागरिक सुध्दा आपापल्या परीने या सप्ताहात सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात, सर्वांच्या सहभागाने आणि सहकार्याने भक्तीमय वातावरणात हा सप्ताह संपन्न होत असतो.
भक्तीमय वातावरण…
कुंभार पिंपळगांव येथे दरवर्षी होत असलेल्या या अखंड हरीनाम सप्ताह निमित्त सर्वत्र भक्तीमय वातावरण पहायला मिळते, सप्ताहात विविध मान्यवर किर्तनकार, समाज प्रबोधनकार यांच्या माध्यमातून बहुमुल्य मार्गदर्शन लाभते.
तरी सदरील आज (दि.21) सप्ताहाच्या समाप्ती निमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन महाप्रसादाचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गांवकरी मंडळी व नवतरूण युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.