Your Alt Text

कुंभार पिंपळगांव येथे अखंड हरीनाम सप्‍ताहाचे आयोजन ! यंदा 25 वे रौप्‍य महोत्‍सव ! | Akhand Harinam Saptah KP

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे मोठ्या उत्‍साहात आणि भक्‍तीमय वातावरणात दर वर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरीनाम सप्‍ताह, ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा तसेच संगीत शिवपुराण कथेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

Saptah0001

दि.14 रोजी समाज प्रबोधनकारक ह.भ.प.जयश्रीताई महाराज तिकांडे, दि.15 रोजी आवाजाचे जादूगर ह.भ.प. महेश महाराज हरवणे, दि.16 रोजी रामायणाचार्च ह.भ.प. माणिक महाराज रेंगे, दि.17 रोजी प्रबोधनकार ह.भ.प. शिवा महाराज बावस्‍कर, दि.18 रोजी विनोदाचार्य ह.भ.प. मधुकर महाराज सायाळकर, दि.19 प्रबोधनकार ह.भ.प.सोपान महाराज कणेरकर, दि.20 विनोदाचार्य ह.भ.प. माऊली महाराज पठाडे तसेच दि.21 मंगळवार रोजी सकाळी 10 ते 12 भागवताचार्य ह.भ.प. गणेशानंद महाराज शास्‍त्री वृंदावन यांचे कार्याल्‍याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

दैनंदिन कार्यक्रम :-

सकाळी 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 7 विष्‍णू सहस्‍त्रनाम पाठ, 7 ते 11 ज्ञानेश्‍वरी पारायण, 11 ते 1 गाथा भजन, दुपारी 2 ते 5 संगीत शिवपुराण कथा (ह.भ.प.रामेश्‍वर महाराज कव्‍हळे), 6 ते 7 हरिपाठ व 9 ते 11 हरिकिर्तन व नंतर हरीजागर होईल. सप्‍ताहाचा आरंभ दि.14 मंगळवार रोजी होईल व सांगता दि.21 रोजी मंगळवार रोजी होईल.

व्‍यवस्‍था / सेवा :-

गांव व परिसरातील विविध क्षेत्रातील व्‍यक्‍ती या महत्‍वपूर्ण अखंड हरीनाम सप्‍ताहासाठी आपापल्‍या परीने सेवा देण्‍याचा प्रयत्‍न करत असतात, ज्‍यांना जसे जमेल तसे या अखंड ह‍रीनाम सप्‍ताहासाठी सेवा देवून भाविकांची व्‍यवस्‍था करत असतात.

सकाळचा नाश्‍ता :-

दि.14 ते 20 अनुक्रमे महेश दाड, कुंडलिक आसाराम कंटुले, अमोल चंद्रकांत शिरजोजी, प्रकाश पांडूरंग बिलोरे, छत्रपती गणेश मंडळ, संतोष आप्‍पा गबाळे, पिंपळगांवचा राजा गणेश मंडळ द्वारे करण्‍यात आली आहे.

दुपारचे अन्‍नदाते :-

दि.14 ते 20 दुपारचे अन्‍नदाते अनुक्रमे राजेंद्र गुलाबशेठ लुंगारे, प्रकाश विठ्ठलराव कंटुले, हरिओम मदनबापू कंटुले, परसआप्‍पा हिंगमिरे, ज्ञानेश्‍वर माऊली वळसे, चंद्रकांत रामभाऊ गुजर, वामनतात्‍या चव्‍हाण, संतोष बालझाटे हे असतील.

संध्‍याकाळचे अन्‍नदाते :-

दि.14 ते 20 संध्‍याकाळचे अन्‍नदाते लक्ष्‍मण तुकाराम कंटुले, ज्ञानेश्‍वर माऊली कंटुले, अॅड विनोद आसाराम तौर, विठ्ठलबापू राऊत, दत्‍ता मधूकर कंटुले, भगवानराव वळसे, स्‍वामी विवेकानंद मित्र मंडळ हे असतील.

चहापाणी व्‍यवस्‍था :-

दि.14 ते 20 चहापाणी व्‍यवस्‍थाप अनुक्रमे वीरशैव लिंगायत समाज बांधव, संत जगनाडे तेली युवा मंच, माहेश्‍वरी युवा मंच, छत्रपती शिवाजी गणेश मंडळ, सुवर्णकार समाज बांधव, महाकाल मित्र मंडळ, मराठा युवा मंच यांच्‍या द्वारे असेल.

गांवनिहाय हरीजागर :-

दि.14 रोजी मुती, गुंज, लिंबी, नाथनगर, नागोबाची वाडी. दि.15 रोजी भादली, शिवणगाव, उक्‍कडगांव, थडी पिंपळगांव, राजाटाकळी. दि. 16 रोजी कोठी, मुद्रेगांव, टेंभी अंतरवाली, मंगरूळ, भोगगाव. दि.17 रोजी मुरमा, शेवता, तिर्थपुरी, खालापुरी, दहीगव्‍हाण. दि.18 रोजी पिंपरखेड, अरगडे गव्‍हाण, खडका, बोडखा, मांदळा. दि.19 रोजी लिंबोणी, पाडुळी, सिंदखेड, चिंचोली, घाणेगांव. तसेच दि.20 रोजी भेंडाळा देवी दहेगांव, घोन्‍सी, मासेगांव, जिरडगांव, आसनगांव, जांबसमर्थ हरीजागर करण्‍यात येईल.

सदरील अखंड हरीनाम सप्‍ताहाचे आयोजन श्री महारूद्र मंदिर परिसर, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्‍मारक चौक, कुंभार पिंपळगांव येथे करण्‍यात आले असून पंचक्रोशीतील भाविक भक्‍तांनी अखंड हरीनाम सप्‍ताहाचा लाभ घ्‍यावा असे आवाहन समस्‍त गांवकरी व नवतरूण युवक मंडळाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

सरकारी योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!