Your Alt Text

कुंभार पिंपळगांवच्‍या बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत ग्राम विकास युवा मंच च्या वतीने आंदोलन.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथील ग्रामविकास युवा मंचने विविध मागण्‍यांसाठी दि.30 रोजी बॅंक ऑफ महाराष्‍ट्र शाखा कुंभार पिंपळगांव येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करून बॅंक प्रशासनाचे लक्ष वेधले. यापूर्वी निवेदन देवूनही बॅंक प्रशासनाकडून कोणत्‍याही प्रकारची दखल घेण्‍यात आली नसल्‍याने सदरील आंदोलन करण्‍यात आले.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, कुंभार पिंपळगाव (ता.घनसावंगी जि.जालना) येथील ग्राम विकास युवा मंचच्‍या वतीने दि.१३ रोजी बॅंक ऑफ महाराष्ट्र कुंभार पिंपळगाव शाखेचे व्यवस्थापक यांच्‍या मार्फत महाव्यवस्थापक विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात असे नमूद करण्यात आले होते की, बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा कुंभार पिंपळगाव येथे कर्मचारी संख्या वाढवून केवायसी सह इतर कामे तातडीने करण्यात यावीत, नसता सात दिवसांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.

सदरील निवेदन देवून सात दिवस झाले होते परंतु संबंधित बॅंक प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे याचा नाहक त्रास खातेदारांना सोसावा लागत असुन शासनाने सुरू केलेल्या योजनांचा लाभ या शाखेत योग्य वेळेत मिळत नाही तसेच खात्यात रक्कम शिल्लक असुन देखील केवळ केवायसी नसल्याने नागरिकांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे. सात दिवसांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे परत ग्राम विकास युवा मंच व गावकरी यांच्या वतीने सात दिवसांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले की, अशा प्रकारचे निवेदन संबंधित विभागांना देवून सुध्दा संबंधित विभागाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही.

त्यामुळे सोमवार दि.३० रोजी पर्यंत आपण संबंधित विभागांना सक्त आदेश देवुन येथील शाखेत कर्मचारी संख्या वाढवून केवायसी सह इतर कामे तातडीने होण्यासाठी आदेश द्यावेत, नसता कुंभार पिंपळगांव येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय जालना सह जि.प्रबंधक जि.अग्रणी बॅंक जालना, तहसिलदार तहसिल कार्यालय घनसावंगी, पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे घनसावंगी, बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा कुंभार पिंपळगाव मार्फत महाव्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्‍या होत्‍या.

वेळोवेळी निवेदन देवूनही दखल घेण्‍यात न आल्‍याने अखेर नाईलाजाने सोमवार दि.३० रोजी ग्रामविकास युवा मंच च्‍या वतीने बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आले. या शाखेत व बॅंकेच्या गेट व पायरी वर बसून हातात मागणी चे फलक ( बोर्ड) घेवून मागणीशी संबंधित घोषणा देण्यात आल्‍या.

या प्रसंगी शाखा व्यवस्थापक हितेशकुमार दामोर यांनी या आंदोलनाची दखल घेवून येत्या आठ दिवसांत खातेदारांना केवायसी सह इतर कामे तातडीने करण्यात येईल .तसेच उद्याच एक कर्मचारी बोलवण्यात येईल असे त्यांनी लेखी पत्र ग्राम विकास युवा मंच च्या पदाधिकारी यांना देवून आंदोलन स्थगित करण्यासाठी विनंती केली. या वर वरील सर्व कामे येत्या आठ दिवसांत न झाल्यास परत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी ग्राम विकास युवा मंच चे पदाधिकारी प्रकाश बिलोरे, संजय कंटुले, इब्राहिम पठाण,संजय गोफणे, सिध्देश्वर कंटुले, प्रशांत बुरसे अंकुश कंटुले शिवाजी जायभाये आलकेश व्यवहारे, वैभव कुलकर्णी, नाजेम पठाण, अक्षय चांडक, सुरेश चमचे, धनंजय संघवी, काशीम शेख हामीद शेख,शुभम व्यवहारे, मोहिन कुरेशी, सोमेश्वर सावंत, मल्लीनाथ बुरसे, कौतिक काळे तसेच जेष्ठ पत्रकार इब्राहिम भाई पठाण यांच्या सह गावातील नागरिक महिला पुरुष खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!