एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील फेरोजभाई अफसर शेख (वय 40) यांचे दि.७ रोजी कुंभार पिंपळगांव – आष्टी रोडवर रात्री ९ ते १० दरम्यान अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुले, ३ मुली, २ भाऊ असा मोठा परिवार आहे.
फेरोजभाई लहान असतांना त्यांच्या वडीलांचे निधन झाले होते, त्यामुळे फेरोजभाई यांच्यावरच आई, भाऊ, बहीणी अशा सर्वांची जबाबदारी होती. फेरोज भाई यांनीच दिवसरात्र मेहनत करून बहीणीचे लग्न सुध्दा केले.
दि.८ रोजी त्यांच्यावर कुं.पिंपळगाव येथील कब्रिस्तान मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, पाहुणे, मित्रांसह कुंभार पिंपळगांव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फेरोजभाई हे सर्वांशी हसत खेळत आणि मिळून मिसळून राहणारे व्यक्ती होते, गेल्या अनेक वर्षांपासून ते वाहन चालवत असल्याने त्यांचा असंख्य लोकांशी चांगला जनसंपर्क होता. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा उमेदीच्या काळात अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.