Your Alt Text

कोणीही निवडून येवो, स्विकार करा ! विजयी उमेदवाराला शुभेच्‍छा द्या आणि पुढील काळात त्‍यांना प्रश्‍न विचारण्‍याची स्‍वत:ला सवय पण लावा !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
निवडणुका येतात आणि जातात, संबंधित जागेवर कोणीही एकच उमेदवार जिंकत असतो. अर्थातच हार जीत होत असते. संबंधित पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते किंवा नेत्‍यांचे समर्थक हे निवडणुकीत शक्‍य ते प्रयत्‍न करून आणि प्रचंड मेहनत घेवून आपापल्‍या उमेदवारांसाठी प्रचार करत असतात. बाकी मतदान कोणायला करायचे हे जनता ठरवत असते आणि त्‍यानुसार उमेदवार निवडत असते.

निवडणुकीत कार्यकर्ते आपापल्‍या नेत्‍याच्‍या वक्‍तृत्‍वावर, कर्तृत्‍वावर, कार्यशैलीवर, विचारसरणीवर किंवा इतर कारणामुळे प्रभावीत होवून नेत्‍याचे अथवा उमेदवाराचे समर्थन करत असतात. पण बऱ्याचदा असे होते की, आपल्‍या उमेदवाराच्‍या समर्थनाच्‍या नादात तो कार्यकर्ता आपले मित्र, नातेसंबंधी, अडीअडचणीत आपल्‍याला साथ देणारे व आपल्‍या सुख दुखात सहभागी होणारे यांना कळत नकळत शत्रू समजू लागतो.

परंतू हे योग्‍य नाही, निवडणुकी पुरते आपण कोणाला विरोधक समजू शकतो, तिथपर्यंत ठीक आहे, परंतू निवडणुकीनंतरही कोणाला शत्रू समजणे योग्‍य नाही. काही कालावधीसाठी आपण वर्षानुवर्षे असलेले नातेसंबंध, मित्रता संपुष्‍टात आणू शकत नाही. त्‍यामुळे जो निकाल लागेल तो खुल्‍या मनाने मान्‍य करून आपले संबंध बिघडणार नाही याची काळजी प्रत्‍येक कार्यकर्त्‍याने आणि समर्थकांनी घेणे आवश्‍यक आहे.

आमदार सर्वांचा !

मतदारसंघातून निवडून येणारा उमेदवार अर्थातच आमदार हा एका पक्षापुरता मर्यादित नसतो तर तो संपूर्ण मतदारसंघाचा असतो. अर्थातच मतदारसंघातील कोणत्‍याही पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा सर्वसामान्‍य नागरिक असो तो आमदार सर्वांचा असतो. मतदारसंघातील प्रत्‍येक नागरिक आपले प्रश्‍न, आपल्‍या समस्‍या त्‍या आमदारासमोर मांडू शकतो, पाठपुरावा करू शकतो यात शंका नाही.

घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून कोणताही उमेदवार निवडून येवो त्‍यास पुढील वाटचालीसाठी अर्थातच सर्वांच्‍या शुभेच्‍छा असाव्‍यात. निवडून आलेल्‍या उमेदवाराचा स्विकार अर्थातच सर्वजण करत असतात आणि जनतेचा जनादेश समजून तो सर्वांनी स्विकार सुध्‍दा करायचा असतो, अर्थातच लोकशाहीला हेच अपेक्षित आहे.

प्रश्‍न विचारू शकता !

घनसावंगी मतदारसंघातून निवडून येणारा उमेदवार हा अर्थातच संपूर्ण घनसावंगी मतदारसंघाचा आमदार राहणार असल्‍याने या सन्‍माननीय आमदार महोदयांकडून जनतेच्‍या अर्थातच काही अपेक्षा राहणार आहेत. मतदारसंघातील मतदार हे स्‍वतंत्रपणे किंवा सामुहिकपणे सदरील आमदार महोदयांना येणाऱ्या काळात प्रश्‍न विचारू शकतात, त्‍यांच्‍या समोर आपले प्रश्‍न आणि समस्‍या मांडू शकतात. पाठपुरावा करू शकतात, त्‍यात काही चुकीचे नाही.

एल्‍गार न्‍यूज प्रश्‍न मांडणार !

एल्‍गार न्‍यूज घनसावंगी तालुक्‍यातील, जालना जिल्‍ह्यातील आणि अधून मधून राज्‍यातीलही अनेक प्रश्‍न वेळोवेळी लेखणीच्‍या माध्‍यमातून मांडत असतो. एल्‍गार न्‍यूज सुरू झाल्‍यापासून घनसावंगी मतदारसंघातील प्रश्‍न प्राधान्‍याने मांडण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला आहे. इतर मतदारसंघांप्रमाणेच घनसावंगी मतदारसंघातून सुध्‍दा कोणीही निवडून येवो, त्‍या सन्‍माननीय आमदार महोदयांना पुढील वाटचालीसाठी एल्‍गार न्‍यूजच्‍या शुभेच्‍छाच राहणार आहेत. मात्र वेळोवेळी घनसावंगी मतदारसंघातील प्रश्‍न आणि समस्‍या सुध्‍दा एल्‍गार न्‍यूज लेखणीच्‍या माध्‍यमातून मांडणार आहे यात शंका नाही.

असं म्‍हटलं जातं की, प्रसार माध्‍यमांनी तटस्‍थपणे आपली भुमिका पार पाडायला पाहिजे, वेळोवेळी लेखणीच्‍या माध्‍यमातून संबंधित लोकप्रतिनिधीला आणि सत्‍तेला प्रश्‍न विचारायला पाहिजे. कधी साध्‍या शब्‍दात तर कधी तिखट शब्‍दात आवाज उठवायला पाहिजे. अर्थातच अनेक पत्रकार बांधव हे करत असतात. एल्‍गार न्‍यूज सुध्‍दा अशाच प्रकारे लेखणीच्‍या माध्‍यमातून मतदारसंघातील विविध प्रश्‍न सातत्‍याने मांडत आहे व यापुढेही मांडणार आहे यात शंका नाही.

जनतेच्‍या अपेक्षा !

घनसावंगी मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आमदार महोदयांनी या मतदारसंघातील प्रलंबित विविध प्रश्‍न येत्‍या काळात जलदगतीने मार्गी लावावेत अशी जनतेची अपेक्षा आहे. निवडून येणाऱ्या आमदार महोदयांनी आपल्‍या आसपासच्‍या चार चौघांच्‍या सल्‍लयावर अवलंबून न राहता सर्वसामान्‍य जनतेला काय अपेक्षित आहे, त्‍यांच्‍या काय अडचणी आहेत, समस्‍या काय आहेत हे स्‍वत: किंवा नेहमीपेक्षा वेगळ्या लोकांच्‍या माध्‍यमातून किंवा एखाद्या डिजिटल माध्‍यमातून समजून घेण्‍याचा प्रयत्‍न करावा आणि त्‍यानुसार त्‍या समस्‍या, त्‍या अडचणी सोडवण्‍याचा प्रयत्‍न करावा एवढीच माफक अपेक्षा जनतेतून व्‍यक्‍त होत आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!