Your Alt Text

ड्रोन कॅमेरे रात्री काय पाहून राहिलेत ? गावागावात घिरट्या घालून राहिलेत ! कोणालाच काही कळायना गेलंय, कोणता खजिना ते शोधून राहिलेत..?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठण) :-
मागील काही दिवसांपासून अंबड व घनसावंगी तालुक्‍यातील अनेक गावांवर ड्रोन घिरट्या घालत आहे, एखाद्यावेळी असते तर नागरिकांना काही वाटले नसते, परंतू वारंवार हे ड्रोन गावावर घिरट्या घालत असल्‍याने नागरिकांमध्‍ये भितीचे वातावरण दिसून येत आहे.

विशेष म्‍हणजे महसूल किंवा पोलीस प्रशासनाकडे अशा प्रकारे ड्रोन उडवण्‍याबाबत कोणीही नोंद केलेली नाही अथवा परवानगी घेतलेली नाही. याचाच अर्थ अज्ञात व्‍यक्‍तीकडून हे ड्रोन उडवले जात आहेत, ड्रोनची संख्‍या फक्‍त एक नाही तर जास्‍त आहे. त्‍यामुळे सदरील ड्रोन हे संशयास्‍पद असल्‍याचे दिसून येत आहे.

सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या मनात असलेले प्रश्‍न, शंका, अस्‍वस्‍थता, विविध चर्चा, यातून सहज एक काव्‍य रचना वेगळ्या शब्‍दात लिहावीशी वाटली, त्‍यामुळे संपादकांनी थोड्या वेगळ्या शब्‍दात खालील काव्‍य रचना लिहून प्रकाशित केली आहे. (आवडल्‍यास व्‍हाट्सअॅप / फेसबुक वर किंवा खाली कमेंट बॉक्‍स मध्‍ये आपल्‍या प्रतिक्रिया कळवाव्‍यात.)

काव्‍य रचना !

ड्रोन कॅमेरे रात्री काय पाहून राहिलेत ?
गावागावात घिरट्या घालून राहिलेत !
कोणालाच काही कळायना गेलंय
कोणता खजिना ते शोधून राहिलेत ?

रात्री लोकं घराबाहेर येवून राहिलेत
वर पाहिलं तर लाईटा दिसून राहिलेत !
लाल, निळे, हिरवे, पिवळे लाईट पाहून
मग अधिकच बुचकळ्यात पडून राहिलेत !

चिडून पोरं ड्रोनला दगडं मारून राहिलेत !
दगड तं लागेना पण पत्रं वाजून राहिलेत !
ड्रोनच्या भितीने झोपावं की उठावं कळेना
लोकं मग काय डोकं खाजवून राहिलेत !

पत्ताच नाही ड्रोन कोण उडवून राहिलेत ?
पोलीसांना नेहमी ते चकवा देवून राहिलेत !
परवानगी शिवाय कोणालाच सूट नाही
मग हे कोण गावभर ड्रोन फिरवून राहिलेत ?

कोणीतरी मिल्ट्रीची कंपनी सांगून राहिलेत
उगाचच कशाला अफवा पसरवून राहिलेत !
प्रशासनाकडे नाही तशी कुठलीच नोंद
मग अंदाजेच कोण पुड्या सोडून राहिलेत ?

तहसीलवाले तर नुसतं बघून राहिलेत !
पोलीसबी कवाचं तपासच करून राहिलेत !
कार्यकर्त्यांचे फोन नेत्यांना सुरूच आहेत
नेते बी कार्यकर्त्यांना धीर देवून राहिलेत !

बरं उत्तर कोणीच नाही देवून राहिलेत !
मग पत्रकार प्रश्न विचारून राहिलेत
तपासाचं बघा साहेब, नसता म्हणू नका
लईच तिखट बातम्या येवून राहिलेत !

  • संकलन एल्‍गार न्‍यूज

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!