Your Alt Text

बँक कर्जासाठी कोणाला जामीनदार म्‍हणून सही देताय ? थोडं थांबा ! नाहीतर तुम्‍हाला पैसे भरावे लागतील ? | Guarantor for Loan

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज विशेष :-
Guarantor for Loan : आपले मित्र किंवा ओळखीच्‍या व्‍यक्‍तीला जेव्‍हा बँक कर्ज घेण्‍यासाठी जामिनदाराची गरज भासते तेव्‍हा आपण सहज त्‍यास जामीनदार होतो आणि सही देतो. परंतू संबंधित व्‍यक्‍तीची योग्‍य ती माहिती न घेता आणि कोणताही विचार न करता आपण जामीनदार राहील्‍यास कदाचित तुम्‍ही अडचणीत येवू शकता, कसं ते पाहुया.

बँका विविध प्रकारचे कर्ज देत असतात, व्‍यवसाय कर्ज, पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) होम लोन (गृह कर्ज) किंवा इतर अनेक प्रकारचे कर्ज असतात, एखादा व्‍यक्‍ती जेव्‍हा बँकेकडे कर्ज मागण्‍यासाठी जात असतो तेव्‍हा शक्‍यतो बँका कर्जाची मागणी केलेल्‍या अर्जदाराला सांगतात की, या कर्ज प्रकरणासाठी तुम्‍हाला जामीनदार द्यावा लागेल.

जेव्‍हा कोणी परिचित व्‍यक्‍ती किंवा मित्र तुमच्‍याकडे जामीनदार व्‍हा म्‍हणून येत असतो तेव्‍हा तुम्‍ही सहज त्‍याला जामीनदार होवून संबंधित अर्जावर सही देता, त्‍यामागे आपली भावना असते की, आपल्‍या जवळच्‍या माणसाला मदत करावी, किंवा आपल्‍या मित्राला जामीनदार म्‍हणून सही दिल्‍यास त्‍याची अडचण दूर होईल, त्‍याला कर्ज मिळेल. इथपर्यंत ठीक आहे.

परंतू तुमचा मित्र किंवा परिचित व्‍यक्‍ती जो कर्ज घेत आहे तो कर्ज फेडेल का ? वेळेवर हफ्ते भरेल का ? याची माहिती घेवूनच निर्णय घेणे आवश्‍यक आहे. कारण बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे की, कर्ज घेणारा संबंधित व्‍यक्‍ती काही कारणाने कर्ज फेडत नाही, किंवा तो गाव सोडून दुसऱ्या गावाला जातो आणि कर्जाचे हप्‍ते वाढत जातात.

Guarantor for Loan

काही वेळा तर असेही दिसून आले आहे की, कर्ज घेणाऱ्या संबंधित व्‍यक्‍तीचा दुर्दैवाने मृत्‍यू झाल्‍यास बँका जामीनदाराला पैसे भरण्‍या बाबत नोटीस पाठवत असतात. कारण कोणतेही असो, एखाद्या व्‍यक्‍तीला जामीनदार राहणे म्‍हणजे त्‍या व्‍यक्‍तीच्‍या कर्जाची आपण हमी घेणे असते. अर्थातच जेव्‍हा आपण जामीनदार म्‍हणून सही देत असतो, त्‍यावेळी आपण संबंधित व्‍यक्‍तीची हमी घेत असतो.

कर्जासाठी जामीनदार होणे म्‍हणजे त्‍या व्‍यक्‍तीने पैसे भरले नाही तर पैसे मी भरेल अशी हमी असते. कर्ज घेणाऱ्या व्‍यक्‍तीने कोणत्‍याही कारणाने पैसे भरले नाहीत तर बँक जामीनदाराकडून पैसे वसूल करण्‍यासाठी जामीनदाराला सुध्‍दा नोटीस पाठवित असते. ज्‍याने कर्ज घेतले आहे त्‍या व्‍यक्‍तीने कर्जाची रक्‍कम परत केली नाही तर बँका त्‍या कर्जदाराची संपत्‍ती विकून पैसे वसूल करू शकतात.

एवढंच नव्‍हे तर कर्जदाराची संपत्‍ती विकून भरपाई होत नसेल तर बँका जामीनदाराची सुध्‍दा संपती ताब्‍यात घेवू शकतात. यासाठीही वेगवेगळे नियम आहेत.

जामीनदार आणि साक्षीदार मधील फरक :-

जेव्‍हा तुम्‍ही एखाद्या व्‍यक्‍तीला कर्ज घेण्‍यासाठी बँकेला हमी देता, म्‍हणजेच कर्जदाराने पैसे फेडले नाही तर मी भरेल अशी हमी देता तेव्‍हा तुम्‍ही जामीनदार असता. मात्र जेव्‍हा तुम्‍ही एखाद्या प्रकरणात फक्‍त उपस्थित असता आणि सदरील प्रकरण किंवा कार्य माझ्या समोर झाले आहे हे दर्शविण्‍यासाठी सही करता तेव्‍हा तुम्‍ही साक्षीदार असता.

जामीनदार होतांना काय काळजी घ्‍यावी ?

एखादा व्‍यक्‍ती व्‍यवसायासाठी किंवा इतर कारणासाठी कर्ज घ्‍यायचे म्‍हणून तुम्‍हाला जामीनदा व्‍हा म्‍हणून सांगत असतो आणि सही मागत असतो, अशावेळी तो व्‍यक्‍ती किती कर्ज घेत आहे ? कर्ज घेतल्‍यानंतर तो फेडू शकतो का ? यापूर्वीची त्‍याची पार्श्‍वभूमी काय आहे ? त्‍याच्‍याकडे इतर लोकांचे देणे आहे का ? त्‍याचा मार्केट मध्‍ये रेकॉर्ड चांगला आहे का ? जर त्‍या व्‍यक्‍तीने कर्ज फेडले नाही तर तुम्‍ही फेडू शकता का ? या प्रश्‍नांची उत्‍तरे आधी स्‍वत:ला विचारा जर तुम्‍हाला योग्‍य उत्‍तर मिळाले तर जामीनदार व्‍हा.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

नियमित रोखठोक, निष्‍पक्ष व निर्भीड बातम्‍या व आर्टीकल आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!