Your Alt Text

शिक्षण, रोजगारासह सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या हितासाठी कार्यरत असलेले विशेष व्‍यक्तिमत्‍व म्‍हणजे शाम नाना उढाण !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या हितासाठी नेहमी कार्यरत असणारे, युवकांना रोजगार मिळवून देण्‍यासाठी प्रयत्‍नशील असलेले तसेच ग्रामीण भागातही इंग्रजी शिक्षणाची सुविधा उपलब्‍ध करून देणारे विशेष व्‍यक्तिमत्‍व म्‍हणजे माजी जि.प. सदस्‍य शामनाना उढाण होय. आज दि.04 जून रोजी त्‍यांचा वाढदिवस आहे त्‍यानिमित्‍त त्‍यांच्‍या जीवनावर प्रकाश टाकणारा हा शब्‍दप्रपंच.

जीवन परिचय…

शाम नाना यांचे पूर्ण नाव शामसुंदर वसंतराव उढाण आहे. शामनाना यांचा जन्‍म 4 जून 1976 रोजी झाला.
वडील वसंतराव (बप्‍पा) उढाण व आई भारतबाई वसंतराव उढाण यांनी शाम नाना यांना सुरूवातीपासूनच शिक्षणासाठी प्रोत्‍साहन दिले. तसेच भाऊ पुरूषोत्‍तम उढाण यांचेही सहकार्य लाभले. शाम नाना यांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण नाशिक येथे झाले, तर पदवीचे शिक्षण देवगिरी कॉलेज छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झाले. त्‍यानंतर पदव्‍युत्‍तर पदवी म्‍हणजे M.A. चे शिक्षण फर्ग्‍यूसन कॉलेज येथे झाले.

शाम नाना उढाण यांना शिक्षणानंतर नोकरीची इच्‍छा नव्‍हती, त्‍यामुळे त्‍यांनी गावाकडे येवून व्‍यवसाय व समाजकार्य करण्‍याचे ठरवले. कुंभार पिंपळगांव व परिसरातील गावांसह घनसावंगी तालुक्‍यात ते सामाजिक कार्य करत राहीले. त्‍यांच्‍या कार्याची दखल घेवून कुंभार पिंपळगांव सर्कल मधील जनतेने त्‍यांना जिल्‍हा परिषद सदस्‍य म्‍हणून निवडून दिले. सदस्‍य झाल्‍यानंतर शाम नाना यांनी विविध विकास कामे करून जनतेचे प्रश्‍न सोडवण्‍याचा प्रयत्‍न केला.

ताई आणि नाना !

शाम नाना यांनी शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर व गावाकडे परतल्‍यानंतर 2003 मध्‍ये किर्तीताई यांच्‍याशी लग्‍न केले. किर्ती ताई व शाम नाना उढाण यांना 2 मुले असून मोठा मुलगा B.Tech करत आहे तर लहाना मुलगा 9 वीला आहे. किर्तीताई सुध्‍दा शाम नाना सोबत सामाजिक कार्यात नियमितपणे सक्रीय असतात. किर्तीताई उढाण ह्या जालना जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष सुध्‍दा राहीलेल्‍या आहेत. म्‍हणजेच पती – पत्‍नी दोघेही जिल्‍हा परिषद सदस्‍य राहीलेले आहेत. किर्ती ताई यांनी जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष असतांना जिल्‍ह्यातील जनतेसाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. ज्‍यामध्‍ये लेक वाचवा लेक शिकवा ही योजना सुरू केली. कुंभार पिंपळगांव तिर्थक्षेत्रासाठी प्रयत्‍न केले, घरकुल योजना, पेयजल योजना व इतर योजना राबविल्‍या शिवाय महिला व नागरिकांच्‍या आरोग्‍यासाठी प्रयत्‍न केले.

पहिली इंग्रजी शाळा !

शाम नाना उढाण यांनी ग्रामीण भागातील इंग्रजी शिक्षणाची अडचण लक्षात घेवून कुंभार पिंपळगांव येथे सन 2004 मध्‍ये घनसावंगी तालुक्‍यातील पहिली इंग्रजी शाळा सुरू केली. सदरील शाळा शाम नाना उढाण यांच्‍या मार्गदर्शनाखाली व किर्तीताई उढाण यांच्‍या माध्‍यमातून अनेक विद्यार्थी घडवत आहे. अर्थातच शाळेची यशस्‍वी वाटचाल सुरूच आहे.

पहिला पेट्रोल पंप !

प्राप्‍त माहितीनुसार घनसावंगी तालुक्‍यात पहिला पेट्रोल पंप कुंभार पिंपळगांव येथे शाम नाना यांनीच सुरू केला. सदरील पेट्रोल पंपामुळे कुंभार पिंपळगांव परिसरातील 30 ते 40 गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. शिवाय अंबड – पाथरी महामार्गावरील वाहनधारकांनाही चांगली सुविधा झाली.

युवकांच्‍या रोजगारासाठी प्रयत्‍न !

सुरूवातीच्‍या काळात शामनाना उढाण यांनी युवकांना स्‍वयंरोजगार मिळावा किंवा छोटामोठा व्‍यवसाय करता यावा म्‍हणून पतसंस्‍था सुरू करून मोठ्या प्रमाणावर युवकांना कर्ज वाटप केले. या माध्‍यमातून अनेकांनी आपापले छोटे मोठे व्‍यवसाय सुरू केले. फक्‍त कर्जच दिले नाही तर शाम नाना यांनी त्‍यांचे वडील वसंतराव (बप्‍पा) यांच्‍या मार्गदर्शखाली असंख्‍य युवकांना दुकान टाकण्‍यासाठी अनेक वर्ष विना भाडे जागा उपलब्‍ध करून दिली. त्‍यामुळे बस स्‍थानक परिसरात असंख्‍य युवकांना दुकानांच्‍या माध्‍यमातून रोजगार उपलब्‍ध झाला. भविष्‍यात नोकरी व रोजगार मिळावा आयोजित करून युवकांना नोकरी मिळवून देण्‍याचाही त्‍यांचा प्रयत्‍न आहे.

शिंदे गटात प्रवेश !

शाम नाना उढाण यांनी यापूर्वी इतर पक्षात काम केले असले तरी आता ते मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या शिवसेनेत आहेत. त्‍यांनी शिवसेनेत प्रवेश केल्‍यामुळे त्‍यांच्‍या सोबत तालुक्‍यातील युवकांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दिसून येतात. शिवाय त्‍यांनी केलेल्‍या सामाजिक कार्यामुळे त्‍यांना मानणारा वर्गही खूप मोठा आहे.

शुभेच्‍छा !

माजी जि.प. सदस्‍य शाम नाना उढाण यांनी त्‍यांच्‍या कारकिर्दीत अनेक चांगले उपक्रम हाती घेवून सर्वसामान्‍य नागरिकांना दिलासा देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. अर्थातच आजही त्‍यांचे सामाजिक कार्य सुरूच आहे. विशेष म्‍हणजे एवढं सगळं साम्राज्‍य असतांनाही शामनाना यांच्‍यात अहंकार कधीही दिसून आला नाही. त्‍यांच्‍यातील विनम्रपणा हा सुध्‍दा नमूद करण्‍याचा सारखाच आहे. आज दि.4 रोजी त्‍यांचा वाढदिवस आहे, त्‍या निमित्‍त शाम नाना उढाण यांना एल्‍गार न्‍यूज च्‍या वतीने मन:पूर्वक शुभेच्‍छा…

  • परवेज पठाण,
    संपादक, एल्‍गार न्‍यूज
    9890515043

इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!