Your Alt Text

आता व्‍हाट्सअॅपवर मॅसेज करतांना तुम्‍हाला नंबर गायब करता येणार ! दिसेल फक्‍त नाव ! | Whatsapp Chat New Feature

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज विशेष :-
Whatsapp Chat New Feature : व्‍हाट्सअॅप नेहमी आपल्‍या युजरसाठी नवनवीन सुविधा उपलब्‍ध करत असतो, वेळोवेळी नवीन फिचर्स अॅड करत असतो, ज्‍यामुळे त्‍याच्‍या वापरकर्त्‍यांना नवीन सुविधा वापरायला मिळेल, विशेष करून युजर म्‍हणजेच वापरकर्त्‍यांच्‍या प्रायवसीसाठी वेळोवेळी अपडेट आणत असतो.

आपणास माहितच आहे की, जगभरात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, त्‍यात फेसबुक, इन्‍स्‍टाग्राम, टवीटर आणि व्‍हाट्सअॅप युजर्सची संख्‍या खूप मोठी आहे. इतर प्‍लेटफॉर्मवर तुम्‍ही नंबर नसेल तरीही चॅट करू शकता परंतू व्‍हाट्सअॅप मध्‍ये अशी सुविधा नव्‍हती.

Whatsapp Chat New Feature

आता व्‍हाट्सअॅपने युजर्ससाठी एक भन्‍नाट फिचर आणले आहे, या सुविधे अंतर्गत तुम्‍हाला तुमचा मोबाईल नंबर प्रदर्शित करण्‍याची आवश्‍यकता राहणार नाही. म्‍हणजेच तुम्‍ही फक्‍त नावाच्‍या सहाय्याने सुध्‍दा एकमेकांशी चॅटींग करू शकता.

सविस्‍तर समजून घेवू या, सध्‍या तुम्‍ही व्‍हाट्सअॅपवर कोणाशीही संपर्क साधत असल्‍यास किंवा मॅसेज करत असल्‍यास किंवा कोणत्‍याही प्रकारची फाईल पाठवत असल्‍यास तुम्‍हाला समोरच्‍या व्‍यक्‍तीचा मोबाईल नंबर असणे आवश्‍यक असते, म्‍हणजेच तुम्‍ही समोरच्‍या व्‍यक्‍तीच्‍या मोबाईल नंबरच्‍या आधारे त्‍याला मॅसेज करता.

परंतू आता जी सुविधा येत आहे त्‍यानुसार तुम्‍ही तुमचा नंबर गायब करू शकता आणि फक्‍त तुमचे नाव प्रदर्शित करू शकता, म्‍हणजेच समोरच्‍या व्‍यक्‍तीला तुमचा नंबर दिसणार नाही फक्‍त तुम्‍ही (Username) ठेवलेले नावच समोरच्‍या दिसेल. म्‍हणजेच तुमच्‍या नंबरचा गैरवापर होण्‍याची शक्‍यता राहणार नाही. कारण तुमचा नंबरच दिसणार नाही त्‍यामुळे नंबरचा गैरवापर करण्‍याचा प्रश्‍नच येणार नाही.

सदरील पर्याय तुमच्‍या प्रोफाईल मध्‍ये अॅड केला जाणार असून तेथे तुम्‍ही एक नाव सेट करू शकता, या नावात अक्षरे, संख्‍या आणि विशेष वर्ण सुध्‍दा वापरता येवू शकेल, फक्‍त वापरकर्त्‍याचे नाव एकमेकांपासून थोडे वेगळे असेल. म्‍हणजेच एकसारखे नाव नसल्‍यास त्‍यापुढे एखादी संख्‍या तुम्‍ही लावू शकता.

सध्‍याच्‍या घडीला इन्‍स्‍टाग्राम, फेसबुक, ट्वीटर या माध्‍यमांवरही फोन नंबर प्रदर्शित होत नाही, फक्‍त युजरनेम दिसत असतो, अशाच प्रकारची सुविधा आता व्‍हाट्सअॅप मध्‍ये येणार आहे. त्‍यामुळे तुमच्‍या नंबरची गोपनीयता ठेवता येणार आहे. सध्‍या ही सुविधा Bita Version मध्‍ये असून लवकरच ही सुविधा सर्वांसाठी उपलब्‍ध होणार आहे.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

नियमित रोखठोक, निष्‍पक्ष व निर्भीड बातम्‍या व आर्टीकल आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!