Your Alt Text

आप खासदार संजय सिंह यांना ईडी ने केलेली अटक योग्‍य आहे का ? | Sanjay Singh Arrested by ED

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज विशेष :-
Sanjay Singh Arrested by ED : आम आदमी पार्टीचे राज्‍यसभा खासदार संजय सिंह यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात (ED) ईडीने अटक केली आणि तदनंतर कोर्टात हजर केल्‍यानंतर कोर्टाने त्‍यांना 5 दिवसांच्‍या ईडी रिमांड मध्‍ये पाठवले आहे. एक एक करून विरोधकांच्‍या नेत्‍यांना होत असलेली अटक पाहता विरोधकांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

यापूर्वी ईडी कडून आम आदमी पार्टीचे नेते सत्‍येंद्र जैन आणि मनिष सिसोदीया यांनाही अटक करण्‍यात आली होती. आता सरकारच्‍या धोरणांचा कठोर शब्‍दात वेळोवेळी विरोध करणारे आप खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केली आहे, एवढंच नव्‍हे तर इतर विरोधी पक्षाच्‍या नेत्‍यांनावर सुध्‍दा ईडी कार्यवाही करीत आहे. त्‍यामुळे सदरील कार्यवाही ही केंद्र सरकारच्‍या आदेशाने सुडबुद्धीने करण्‍यात येत असल्‍याची टीका विरोधकांकडून करण्‍यात येत आहे.

Sanjay Singh Arrested by ED

संजय सिंह यांना अटक झाल्‍यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद्र केजरीवाल म्‍हणाले की, तथाकथित दिल्‍ली मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडीने आतापर्यंत एक हजाराहून अधिक छापे मारले, अनेकांना अटक केली, हा शंभर कोटींचा घोटाळा असल्‍याचा त्‍यांच्‍याकडून दावा केला जातो, परंतू एवढी छापेमारी करूनही त्‍यांना एक पैसोही सापडला नाही, ना जमिनीचे दस्‍तावेज सापडले, ना सोन्‍या चांदीचे दागिने सापडले, मागील एक वर्षात यांना काहीच मिळाले नाही, तरीही ते जबरदस्‍तीने लोकांना अटक करत आहेत असेही केजरीवाल म्‍हणाले.

संजय सिंह यांची अटक योग्‍य आहे का ?

संजय सिंह यांनी खरंच काही घोटाळा केला असेल किंवा त्‍यांचा कोणत्‍याही प्रकारे सहभाग असेल, आणि ईडी कडे ठोस असे पुरावे असतील तर नक्‍कीच कार्यवाही व्‍हायला पाहीजे. परंतू जर ईडी कडे कोणत्‍याही प्रकारचे पुरावे नसतील आणि कोणाला तरी उभं करून संजय सिंह यांचे नाव घेण्‍यास भाग पाडून सुडबुध्‍दीने कार्यवाही करण्‍यात येत असेल तर हे नक्‍कीच धक्‍कादायक आहे. अशी प्रतिक्रिया माध्‍यमांमध्‍ये उमटत आहे.

ज्‍याने कोणी चुकीचे काम केले असेल आणि तसे मजबूत पुरावे जर ईडीकडे असतील तर कार्यवाही करण्‍याला विरोध नाही, परंतू केंद्र सरकारचा विरोध करणाऱ्यावरच सुडबुध्‍दीने ईडी कार्यवाही करत असेल तर ही धोक्‍यांची घंटा आहे. अशीच मानसिकता राहील्‍यास पुढील काळात जेव्‍हा कधी दुसऱ्या पक्षाचे सरकार येईल ते सुध्‍दा अशाच प्रकारे ईडीचा वापर केल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही, मात्र अशा प्रकारची मानसिकता ही लोकशाहीसाठी मुळीच योग्‍य नाही. कारण म्‍हातारी मेल्‍याचे दु:ख नाही, काळ सोकावतोय… अशी प्रतिक्रिया सुध्‍दा माध्‍यमांमध्‍ये नागरिक व्‍यक्‍त करत आहेत.

राजकारण विकासाचे व्‍हावे !

ज्‍या प्रमाणे केंद्रीय रस्‍ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशात राष्‍ट्रीय महामार्गाचे मजबूत जाळे निर्माण केले आहे, ज्‍या प्रमाणे त्‍यांनी काश्मिर ते कन्‍याकुमारी पर्यंत राष्‍ट्रीय महामार्ग बांधले आहेत, त्‍याला कोणीच नाकारू शकत नाही. आज विरोधक सुध्‍दा नितीन गडकरी यांना मानतात, कारण त्‍यांनी केलेले कार्य इतिहासात नोंद होईल असेच आहे. जेव्‍हा असे कोणी काम करत असतो तेव्‍हा त्‍याला इतर डोकं लावण्‍याची आवश्‍यकताच भासत नाही.

नितीन गडकरी हे ना कोणावर टीका करतात ना कोणाविषयी द्वेष ठेवतात, एवढंच काय विरोधकांचे काम सुध्‍दा ते सहज करतात. अर्थात विरोधी पक्षाची सत्‍ता असलेल्‍या राज्‍यात सुध्‍दा त्‍यांनी इतरांप्रमाणेच रस्‍ते बांधले आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍या कामाची प्रशंसा वेळोवेळी होत असते.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

नियमित रोखठोक, निष्‍पक्ष व निर्भीड बातम्‍या व आर्टीकल आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!