एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणि पर्यायाने आम आदमी पक्षाला मोठा दिलासा आहे. AAP चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने अंतरीम जामीन मंजूर केल्यामुळे केजरीवाल हे जेलमधून बाहेर आले आहेत.
लोकसभा निवडणुकीत प्रचार करता यावा म्हणून कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडी ने अटक केली होती, आज दि.10 रोजी म्हणजेच 51 दिवसानंतर त्यांना जामीन मंजूर झाला असून आता केजरीवाल बाहेर येवून प्रचार करू शकणार आहेत.
कोर्टाने काय म्हटले ?
सुप्रीम कोर्टाने जामीन देतांना सांगितले की, केजरीवाल हे एक मुख्यमंत्री आहेत, एका राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख आहेत, यात शंका नाही की त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत परंतू अजून ते दोषी सिध्द झालेले नाहीत, त्यांचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड पण नाही, समाजाला त्यांच्यापासून धोका सुध्दा नाही.
हुकुमशाही मंजूर नाही ! – केजरीवाल
देशातील कोट्यावधी नागरिकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, मी सर्वांचा आभारी आहे. मी सुप्रीम कोर्टाचा सुध्दा आभारी ज्यांच्यामुळे आज मी आपल्यासमोर आहे. मी तन-मन-धनाने हुकुमशाहीच्या विरूध्द लढत आहे आणि देशातील सर्वांनाही या हुकुमशाही विरूध्द लढायचे आहे अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर दिली.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह !
अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्यामुळे देशभरातील AAP कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. “घायल शेर और भी ज्यादा खूंखार होता है” अशी प्रतिक्रिया सुध्दा कार्यकर्ते देत आहेत. ज्या प्रमाणे संजय सिंह हे जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांच्या भाषणांमध्ये तिव्र प्रतिक्रिया दिसून आल्या, रोखठोक भाषणे झाली, त्याच प्रमाणे अरविंद केजरीवाल हे सुध्दा तेवढ्याच ताकदीने, उत्साहाने आणि रोखठोकपणे प्रचार करतील अशी प्रतिक्रियाही आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते देत आहेत.
इंडियाला फायदा होणार का ?
अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष सुध्दा इंडिया आघाडीत सामील आहे. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर झाल्यामुळे इंडिया आघाडीच्या मंचावरून ते अर्थातच जोरदार प्रचार करून हुकुमशाही विरूध्द जनतेपर्यंत आपली भावना आणि वस्तुस्थिती मांडणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला अरविंद केजरीवाल यांचा नक्कीच फायदा होईल अशी प्रतिक्रियाही इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेते व्यक्त करत आहेत.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर दिसत असलेल्या “जॉईन करा” या चिन्हाला क्लिक करून आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.