Your Alt Text

VI ची सेवा दिवसभर बंद ! नागरिकांना झालेल्‍या त्रासाची आणि नुकसानीची भरपाई कंपनीचा बाप देणार आहे का ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
नेटवर्क कंपन्‍यांची मनमानी पुन्‍हा सुरू झाली आहे का ? असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे. कारण आता तर मनमर्जीप्रमाणे दिवसभर नेटवर्क बंद ठेवण्‍यात येत आहे, विशेष म्‍हणजे कुठलीही पूर्वकल्‍पना देण्‍यात येत नसून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील व्‍हीआय कंपनीची रेंज (नेटवर्क सेवा) दि.5 रोजी सकाळी अंदाजे 10 ते सायंकाळी 7 वाजेर्यंत पूर्णत: बंद होती. म्‍हणजेच कॉल किंवा इंटरनेट सेवा पूर्णत: बंद झाल्‍यामुळे नागरिकांना अथवा व्‍हीआय ग्राहकांना नाहकत मनस्‍ताप सहन करावा लागला.

प्रत्‍येकाला वाटत होते की, अर्ध्‍या एक तासात सेवा पूर्ववत होईल, परंतू सकाळपासून संध्‍याकाळपर्यंत नेटवर्क पूर्णपणे बंद दिसून आले. अनेकांकडे एकच सिमकार्ड असते, अशा परिस्थितीत एकमेकांना संपर्क साधणे, अडीअडचणीत कॉल करणे, व्‍यवहार करणे, देवाणघेवाणसाठी संपर्क करणे, इंटरनेटद्वारे असलेल्‍या सेवा इत्‍यादींवर परिणाम झाला आणि त्‍यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

कंपन्‍यांची मनमर्जी !

व्‍हीआय किंवा इतर कंपन्‍या ह्या महिना फक्‍त 28 दिवसांचा गृहीत धरतात, महिना संपला तर एक दिवस नव्‍हे तर एक तास सुध्‍दा आउटगोईंग सेवा सुरू ठेवत नाहीत, मग ज्‍या दिवशी या कंपन्‍यांची सेवा दिवभर बंद असते त्‍या दिवसाची भरपाई का दिली जात नाही ? कुंभार पिंपळगांव मध्‍ये दिवसभर नेटवर्क सेवा बंद होती, मग झालेल्‍या त्रासाची आणि नुकसानीची भरपाई कंपनीचा बाप भरून देणार आहे का ? असा सवाल नागरिक करत आहेत.

दिलगिरी पण नाही !

व्‍हीआय (VI) कंपनीच्‍या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे कुंभार पिंपळगाव सह सर्कल मध्‍ये हजारो ग्राहकांना सेवेपासून वंचित रहावे लागले, मात्र कंपनीने किंवा कंपनीच्‍या जिल्‍हा पातळीवरील एकाही कर्मचाऱ्याने कुठलीही पूर्वकल्‍पना दिली नाही अथवा झालेल्‍या त्रासाबाबत दिलगीरी व्‍यक्‍त केली नाही. त्‍यामुळे नागरिकांमध्‍ये रोष पहायला मिळाला. अशा प्रकारे मनमर्जी करणाऱ्या व पैसे घेवूनही सेवा न देणाऱ्या कंपन्‍यांवर केंद्र सरकारने दंड आणि योग्‍य ती कारवाई करायला हवी अशी प्रतिक्रिया सर्वसामान्‍य नागरिकांनी दिली आहे.


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी वर दिसत असलेल्‍या “जॉईन करा” या चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या व्‍हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!