Your Alt Text

सामाजिक बांधिलकीतून उपक्रम ! टंचाईग्रस्‍त कुंभार पिंपळगांवात नवनाथ रूरल कडून मोफत पाण्‍याचा टँकर सुरू !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
प्रत्‍येक गोष्‍ट शासनाकडूनच मिळेल याची वाट पाहत न बसता आपणही स्‍वत:हून काही योगदान द्यावे, समाजाचे आपणही काही देणे लागतो या सामाजिक भावनेतून विविध स्‍तरातून लोक पुढे येत गेल्‍यास अनेक समस्‍या दूर होण्‍यास उशीर लागणार नाही.

असेच एक सामाजिक बांधिलकीतून कार्य घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे सुरू झाले आहे. सध्‍या कुंभार पिंपळगाव येथे तिव्र पाणी टंचाई आहे. नागरिकांना पाण्‍यासाठी भटकंती करावी लागत आहे. सर्वसामान्‍य नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता येथील नवनाथ रूरल कॉ-ऑप क्रेडीट सोसायटी कडून सामाजिक बांधिलकीतून कुंभार पिंपळगांव शहरात 1 पाण्‍याचे टँकर सुरू करण्‍यात आले आहे.

dffsfdfsdf

पावसाळ्यापर्यंत सेवा !

सदरील पाण्‍याचे टँकर (ट्रॅक्‍टर) गल्‍लोगल्‍ली मध्‍ये जावून मोफत पाणी वाटप करत आहे. सामाजिक बांधिलकीतून मोफत पाण्‍याचा हा उपक्रम एक दोन दिवस नव्‍हे तर पावसाळ्यापर्यंत सुरूच राहणार असल्‍याचे नवनाथ रूरल को-ऑप. क्रेडीट सोसायटीचे चेअरमन तथा कृ.उ.बा.समितीचे संचालक दत्‍तात्रय कंटुले यांनी सांगितले आहे.

ग्रामपंचायतकडूनही टँकर !

कुंभार पिंपळगांव येथे प्रशासन व ग्रामपंचायतच्‍या माध्‍यमातूनही 3 मोठे पाण्‍याचे टँकर (ट्रक) सुरू करण्‍यात आले आहे. या टँकरमुळेही नागरिकांना दिलासा मिळत आहे. सदरील टँकर मुख्‍य रस्‍त्‍यांवरील तसेच टँकर जेथे जावू शकेल अशा ठिकाणापर्यंत पाणी पोहोचवत आहे. अर्थातच नागरिकांनी ग्रामपंचायतचेही आभार व्‍यक्‍त केले आहे. मात्र जेथे मोठे टँकर पोहचू शकत नाही अशा ठिकाणी नवनाथ रूरल कडून छोट्या गल्‍ल्‍यांमध्‍ये सुध्‍दा जाईल असे टँकर (ट्रॅक्‍टर) सुरू करण्‍यात आल्‍यामुळे असंख्‍य नागरिकांना लाभ होत आहे.

IMG 20240408 WA0052 Copy

नवनाथ रूरलचे आभार !

कुंभार पिंपळगांव येथील नवनाथ रूरल को-ऑप. क्रेडीट सोसायटीच्‍या माध्‍यमातून सामाजिक बांधिलकीतून नागरिकांसाठी मोफत पाणी पुरवठा कण्‍यात येत असल्‍यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. नवनाथ रूरलने सुरू केलेल्‍या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी त्‍यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे. तसेच शहराचा झालेला विस्‍तार आणि लोकसंख्‍या पाहता इतर मान्‍यवरांनीही टंचाईग्रस्‍त कुंभार पिंपळगांवात मोफत पाणी पुरवठ्यासाठी पुढे यावे अशी अपेक्षाही नागरिकांनी व्‍यक्‍त केली आहे. कारण ज्‍या गाव, शहराने आपल्‍याला भरभरून दिले त्‍याची परतफेड करण्‍याची हीच ती वेळ असते.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!