Your Alt Text

बातमीचा परिणाम ! कुंभार पिंपळगांव येथे पाण्‍याचे टँकर सुरू ! पण वंचित नागरिकांनाही पाणी मिळणार का ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे सध्‍या भीषण पाणी टंचाई आहे, अनेक ठिकाणी विहीरीला पाणी नाही, बोअर आटले आहेत, पाण्‍यासाठी सर्वसामान्‍य नागरिकांना भटकंती करावी लागत आहे, याबाबत एल्‍गार न्‍यूज मध्‍ये बातमी प्रकाशित करताच ग्रामपंचायत व प्रशासनाकडून टँकर सुरू करण्‍यात आले आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे पाण्‍याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून सर्वसामान्‍य नागरिकांना पाण्‍यासाठी वणवण फिरावे लागत आहे, खाजगी टँकरवाल्‍यांना 200 ते 300 रूपये देवून नेहमी पाणी विकत घ्‍यावे लागत आहे. शहरात कामगार, शेतकरी, शेतमजूर व कष्‍टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मग या सर्वांनी मोलमजूरी करून कमवलेले पैसे पाण्‍यात घालायचे का ? असा सवाल नागरिक करत होते.

प्रशासनाकडून दिरंगाई !

दरवर्षी पाणी टंचाई बाबत जिल्‍हाधिकारी बैठक घेवून संबंधितांना आदेश देत असतात, त्‍याच प्रमाणे यावर्षी सुध्‍दा टंचाईग्रस्‍त भागाची माहिती मागवून टँकर सुरू करण्‍याबाबत आदेश देण्‍यात आले होते, मात्र प्रशासनाकडे माहिती उपलब्‍ध होवूनही दिरंगाई होत होती. अर्थातच त्‍यामुळे नागरिकांचे हाल होत होते.

एल्‍गार न्‍यूजचा परिणाम !

कुंभार पिंपळगांव येथील पाणी टंचाई बाबत एल्‍गार न्‍यूज मध्‍ये बातमी प्रकाशित झाल्‍यानंतर ग्रामपंचायत व प्रशासनाने समन्‍वय साधून कुंभार पिंपळगांव येथे तातडीने पाण्‍याचे टँकर सुरू केले आहे. त्‍यामुळे कुंभार पिंपळगांव शहरातील नागरिकांना काही अंशी का असेना दिलासा मिळाला आहे. पाणी टंचाईची बातमी घेतल्‍याबद्दल नागरिकांनी एल्‍गार न्‍यूजचे आभार मानले आहे.

फेऱ्या वाढवणे आवश्‍यक !

प्राप्‍त माहितीनुसार प्रशासनाकडून कुंभार पिंपळगांव शहरात 3 टँकर सुरू करण्‍यात आले असून प्रत्‍येकी 2 फेऱ्या म्‍हणजे 6 फेऱ्या दिवसभरात होत असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. कुंभार पिंपळगाव शहराची लोकसंख्‍या अंदाजे 20 ते 25 हजार आहे. त्‍यामुळे 6 फेऱ्यांमध्‍ये संपूर्ण गावाला पाणी मिळणे अवघड आहे. त्‍यामुळे टँकरच्‍या फेऱ्या (खेपा) वाढवणे आवश्‍यक असल्‍याची प्र‍तिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

छोट्या गल्‍ल्‍यांमध्‍ये अडचण !

कुंभार पिंपळगाव शहरात अनेक भाग असे आहेत जेथे रस्‍ते खूप छोटे आहेत. सदरील गल्‍ल्‍यांमध्‍ये पाण्‍याचे ट्रक जावू शकत नाही, मात्र ट्रॅक्‍टरवरील टँकर जावू शकतात किंवा इतर छोटे वाहन जावू शकतात, त्‍यामुळे ग्रामपंचायत किंवा प्रशासनाने सध्‍या सुरू असलेल्‍या टँकरसह शक्‍य असल्‍यास हजारोच्‍या संख्‍येने वंचित असलेल्‍या गोरगरीब, कामगार व कष्‍टकरी वर्गाचा विचार करून छोट्या गल्‍ल्‍यांमध्‍ये पाणी पोहोचवण्‍याच्‍या दृष्‍ष्‍टीने आवश्‍यक ते प्रयत्‍न करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ग्रामपंचायतचा पुढील पंचनामा लवकरच…


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी वर दिसत असलेल्‍या “जॉइन करा” या चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या व्‍हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!