Your Alt Text

कुंभार पिंपळगांवात विद्युत प्रवाह सुरू असलेली नवीन तार तुटून मुख्‍य रस्‍त्‍यावर पडली आणि…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे जीवघेणा प्रकार समोर आला आहे, गुत्‍तेदाराने बसवलेली विद्युत प्रवाह सुरू असलेली तार खाली पडल्‍याची गंभीर घटना घडली आहे. विशेष म्‍हणजे सदरील नवीन तार बसवून 1 दिवस सुध्‍दा झाला नव्‍हता, तार तुटून खाली पडली मात्र थोडं नुकसान वगळता मोठा अनर्थ टळला.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव शहरातून रस्‍त्‍याचे काम सुरू आहे. तत्‍पूर्वी दोन्‍ही साईडला नालीचे काम सुरू आहे. संबंधित गुत्‍तेदार कंपनीकडून ड्रेनेज (नाली) च्‍या बाजूला नवीन विद्युत पोल उभारून त्‍यावर विजेची तार बसवणे सुरू आहे.

सदरील विजेची नवीन तार बँक ऑफ महाराष्‍ट्र समोरील ज्‍येष्‍ठ पत्रकार इ्ब्राहीम पठाण यांच्‍या सवेरा कॉम्‍प्‍लेक्‍स पासून बस स्‍टॅण्‍डच्‍या दिशेने एक दिवस आधीच बसवण्‍यात आली होती, मात्र दि.23 रोजी अंदाजे सकाळी 5 ते 6 दरम्‍यान सदरील विद्युत प्रवाह सुरू असलेली तार खाली पडली, खाली रस्‍त्‍याच्‍या कडेला वाहनावर ही तार पडली.

सुदैवाने ज्‍यावेळी तार पडली त्‍यावेळी तेथे कोणीही उपस्थित नव्‍हते, त्‍यामुळे कोणतीही जिवीत हानी झाली नाही. वेळीच फोन करून विद्युत पुरवठा बंद करण्‍यास सांगण्‍यात आल्‍यामुळे मोठा अनर्थ टळला. ज्‍या वाहनावर तार तूटून पडली त्‍या वाहनाचे सीट काही प्रमाणात जळाले असून इतर काही अंशी नुकसानही झाले आहे.

याबाबत कुंभार पिंपळगांव येथील विद्युत कंपनीचे सहाय्यक अभियंता श्री.कांबळे यांच्‍याशी संपर्क साधला असता, सदरील तार ओढण्‍याचे किंवा बसवण्‍याचे काम हे संबंधित गुत्‍तेदार यांच्‍याकडे असून आम्‍ही फक्‍त त्‍यांना आवश्‍यक ते सहकार्य करत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

गुत्‍तेदाराचे म्‍हणणे काय ?

सदरील खांबावर (पोलवर) तार बसवण्‍याचे काम ज्‍या गुत्‍तेदारांकडे आहे त्‍या श्री.पवार यांनी सांगितले की, काही तांत्रिक अडचणीमुळे असा प्रकार घडला असावा, तातडीने नवीन तार बसवण्‍यात येत असून हा प्रकार गंभीरच आहे, मात्र भविष्‍यात असा प्रकार होणार नाही त्‍या दृष्‍टीने काळजी घेण्‍यात येईल असे त्‍यांनी सांगितले.

अनर्थ घडला असता तर ?

सदरील तार तुटून रस्‍त्‍यावर पडण्‍याची घटना ज्‍या ठिकाणी घडली तेथे दिवसभर मोठी वर्दळ असते, अंदाजे सुर्योदयाची वेळ असल्‍यामुळे तेथे कोणीही नव्‍हते, परंतू जर ही घटना दिवसभरात केव्‍हाही घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. जर या घटनेत काही बरेवाईट झाले असते तर त्‍याची जबाबदारी कोणाची ? असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करत आहेत.

पुन्‍हा असा प्रकार नको !

सदरील घटनेमध्‍ये तुटून पडलेली तार ही चांगल्‍या दर्जाची होती असे संबंधित गुत्‍तेदार हे सांगत असले तरी 1 दिवस आधीच बसवलेली नवीन तार तुटली कशी ? असा प्रश्‍न अजूनही अनुत्‍तरीत आहे. त्‍यामुळे नवीन बसवण्‍यात येणारी विद्युत तार चांगल्‍या दर्जाची आणि जिवीतेला धोका होणार नाही अशी बसववणे नक्‍कीच गरजेचे आहे, नसता भविष्‍यात अशा प्रकारची घटना घडून काही जिवीत हानी झाल्‍यास याची सर्वस्‍वी जबाबदारी संबंधित गुत्‍तेदार व कंपनीची राहील अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पहा…


FDFDDDFDSFD
व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!