Your Alt Text

कुंभार पिंपळगांव येथील कोट्यावधीच्‍या बेकायदा प्‍लॉटिंगची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार ! – तहसीलदार

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे एन.ए. न करता बेकायदेशीरपणे प्‍लॉटिंग काढून प्‍लॉट विक्री केले जात आहेत. शासनाचे सर्व नियम धाब्‍यावर बसवून प्‍लॉटिंगचा हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे.

भाग – 2

कुंभार पिंपळगांव शिवारात आणि शहराच्‍या लगत असलेल्‍या शिवारात कोट्यावधी रूपयांची प्‍लॉटिंग सुरू आहे. कुंभार पिंपळगांवच्‍या चारही दिशेला बेकायदेशीरपणे प्‍लॉटिंग काढून शासनासह जनतेची सुध्‍दा फसवणूक करण्‍यात येत आहे. विशेष म्‍हणजे प्‍लॉटिंग काढून प्‍लॉट विक्री करणारे लोक स्‍वत:च्‍या नावाने प्‍लॉट विक्री करत आहेत मात्र अजूनही जमीन मुळ मालक म्‍हणजेच शेतकऱ्यांच्‍याच नावावर आहे.

जर स्‍वत:च्‍या नावावर जमिनच नसेल तर इतर कोणाला त्‍या जमिनीत प्‍लॉट पाडून विक्री कशी करता येईल ? विशेष म्‍हणजे कोणत्‍याही प्रकारची शहानिशा न करता फक्‍त बॉण्‍डच्‍या आधारे ग्रामसेवकही ग्रामपंचायतला हे प्‍लॉट लावून गांव नमुना नं. 8 -अ देत आहेत आणि याच 8-अ च्‍या आधारावर रजिस्‍ट्री ऑफीसला नोंदणी करण्‍यात येत आहे. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचीही भुमिका संशयास्‍पद आहे.

कोट्यावधीचा काळा बाजार !

कुंभार पिंपळगांव शहर आणि शिवारात तसेच कुंभार पिंपळगांव लगत असलेल्‍या गावांच्‍या शिवारात कोट्यावधीची प्‍लॉटिंग खरेदी विक्री सुरू आहे. प्राप्‍त माहितीनुसार विविध ठिकाणी सुरू असलेला हा बेकायदेशीर काळा बाजार 100 कोटींच्‍या आसपास असल्‍याचा अंदाज आहे.

दोषी कोण ?

कुंभार पिंपळगांव शिवारात आणि शहरालगत असलेल्‍या शिवारात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्‍या या प्‍लॉटिंग प्रकरणात अनेकांचा आशिर्वाद आहे, जे सर्वसामान्‍य नागरिक सदरील बेकायदेशीर प्‍लॉट घेत आहेत त्‍यांचीही भविष्‍यात अडचण होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे या प्रकरणात सखोल चौकशी होणे आवश्‍यक आहे.

एल्‍गार न्‍यूजचा इम्‍पॅक्‍ट !

एल्‍गार न्‍यूजच्‍या वतीने दि.06 रोजी कुंभार पिंपळगांव येथील कोट्यावधी रूपयाच्‍या बेकायदेशीर प्‍लॉटिंग बद्दल बातमी प्रकाशित करण्‍यात आली होती. प्रशासनाच्‍या वतीने आता या प्रकरणाची दखल घेण्‍यात आली असून चौकशी करण्‍याच्‍या दृष्‍टीने पाऊले उचलण्‍यात येत असल्‍याचे दिसून येत आहे.



पुढील भाग लवकरच…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!