एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन सुरू होते. आता सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्या मान्य केल्या असून राज्यभरात मराठा समाजाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे सुध्दा मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. मराठा समाजाच्या या आनंदा मध्ये ओबीसी समाजातील बांधव सुध्दा सामिल होवून तसेच एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करत आहेत.
सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्या मान्य केल्यानंतर कुंभार पिंपळगांव येथे मराठा व ओबीसी समाजातील बांधवांनी एकमेकांना पेटे वाटून शुभेच्छा देत आहेत. यावेळी दोन्ही समाजातील दिलीप राऊत, शिवाजी कंटुले, बाळू कंटुले, एकनाथ चव्हाण, नाना महानोर, राजाभाऊ भालेकर, शिवाजी राऊत, सतिष डाके, राधाकिसन भालेकर, हसन कुरेशी, वाहेद शेख यांनी एकमेकांना पेढे खाऊ घातले व शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागात आजही मराठा व ओबीसी बांधव व इतर समाज सुध्दा एकमेकांच्या सुख दुखात धावून जातात, सहकार्य करतात तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत गुण्यागोविंदाने राहतात असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.