Your Alt Text

प्रभू श्रीराम मंदिराच्‍या उभारणीमुळे देशभरात उत्‍साह ! पीएम नरेंद्र मोदी

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
ज्‍या क्षणाची आपण सर्व अत्‍यंत आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आज आला आहे, शतकानुशतके वाट पाहिल्‍यानंतर आज आपल्‍या श्री रामाचे आगमन झाले असल्‍याची भावना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्‍यक्‍त केली. आज दि.22 रोजी आयोध्‍येत बांधण्‍यात आलेल्‍या भव्‍य दिव्‍य श्रीराम मंदिरात श्री रामललाच्‍या मुर्तीची प्रतिष्‍ठापणा झाल्‍यानंतर श्री.मोदी बोलत होते.

पुढे बोलतांना पंतप्रधान श्री.मोदी म्‍हणाले की, राम अग्‍नी नसून उर्जा आहे, राम मंदिर हा वाद नसून तोडगा आहे. राम भारताचा आधार आणि विचार आहे. आजपासून पुढील 1000 वर्षानंतरही आजची तारीख विसरली जाणार नाही. श्री राम मंदिराच्‍या उभारणीच्‍या क्षणामुळे प्रत्‍येक भारतीयांमध्‍ये उत्‍साह संचारला आहे. हा क्षण कायम लोकांच्‍या स्‍मरणात राहील.

काही लोक म्‍हणायचे की राम मंदिर बनलं तर आग लागेल परंतू या लोकांना भारताच्‍या सामाजिक विवेकाची जाण नाहीये. कारण राम आग नाही तर उर्जा आहे, राम वाद नाही तर तोडगा आहे, राम केवळ आमचेच नाहीत तर राम सर्वांचेच आहेत. असेही त्‍यांनी सांगितले.

पुढे बोलतांना श्री.मोदी म्‍हणाले की, मंदिर उभारणीच्‍या पलीकडे जावून सर्व देशवासीय एक भव्‍य आणि दिव्‍य भारत निर्माण करतील. हनुमानाची भक्‍ती, सेवा आणि समर्पण यासाठी आपल्‍याला बाहेर काही शोधण्‍याची आवश्‍यकता नाही कारण हे गुण प्रत्‍येक भारतीयात उपजतच असतात.

पीएम श्री.मोदी म्‍हणाले की, आज मला प्रभू श्री रामाचीही माफी मागायची आहे, आपल्‍या त्‍याग आणि प्रयत्‍नांमध्‍ये अशी काही कमतरता होती जी आपण इतक्‍या शतकांपासून करू शकलो नाही, आज ती उणीव भरून निघेल आणि माझा विश्‍वास आहे की देव मला नक्‍कीच माफ करेल.

श्री राम मंदिराचे लोकार्पण

आज दि.22 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते श्री राम मंदिराचे लोकार्पण झाले. यावेळी उत्‍तर प्रदेशच्‍या राज्‍यपाल आनंदीबेन पटेल, मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व इतर मान्‍यवरांच्‍या प्रमुख उपस्थितीत श्री रामलला प्राणप्रतिष्‍ठा करण्‍यात आली.

मान्‍यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला श्रीराम जन्‍मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्‍टचे सर्व मान्‍यवरांसह देश विदेशातील 7000 पेक्षा जास्‍त पाहुण्‍यांना आमंत्रित करण्‍यात आले होते. यावेळी अमिताभ बच्‍चन, रजनिकांत, हेमा मालिनी, माधुरी दिक्षीत, मधुर भांडारकर, कॅटरिना कैफ, सचिन तेंडूलकर, अनिल कुंबळे, मुकेश अंबानी यांच्‍यासह विविध क्षेत्रातील मान्‍यवर तसेच साधू संत, महंत यांची विशेष उपस्थिती होती.


इतर बातम्‍या खाली पहा…

महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!