एल्गार न्यूज :-
लवकरच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मतदान केंद्रावर काही कारणास्तव गोंधळ झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने निवडणूक विभाग प्रयत्नशील असतात, जालना जिल्ह्यातही निवडणूक विभागाकडून विविध प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
निवडणूकीच्या काळात पोलीस आणि प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपाययोजना कराव्या लागतात. आता निवडणूक विभागाने जिल्ह्यातील 850 मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे.
कंट्रोल रूम द्वारे लक्ष
मतदान केंद्रावरील घडामोडी आणि हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कंट्रोल रूम तयार करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून निवडणूक आयोग आणि संबंधित अधिकारी थेट प्रक्षेपण (Live) पाहू शकतील.
;येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक विभागाने यंत्रणा सज्ज करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून जिल्ह्यात जिल्ह्यात 1699 मतदान केंद्रे उभारण्यात येणार असल्याचे कळते, यातील अर्ध्या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
मतदान करतांना गोपनीयतेचा भंग होणार नाही अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. निवडणूक काळात गोंधळ घालणारे तसेच गुन्हेगार यांच्यावर निवडणूक विभागाची नजर असणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक विभाग विविध उपाययोजना करत आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.