Your Alt Text

घनसावंगी पोलीस ठाण्‍याने कुंभार पिंपळगांवात गांजा विक्रीचा परवाना दिलाय का ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण)
अवैध धंदे बंद करण्‍याबाबत स्‍थानिक पोलीसांची मनातून मानसिकता असेल तरच ते बंद होवू शकतात, नसता छुप्‍या पध्‍दतीने ते नियमितपणे सुरूच असतात. पोलीस अधिक्षकांनी 5 दिवसांचा दिलेला अल्‍टीमेटम फक्‍त नावापुरताच होता की काय असा प्रश्‍न आता उपस्थित होवू लागला आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे मोठ्या प्रमाणावर गांजा विक्री होत असून गांजा पिणारे लोक मिळेल तेथे, म्‍हणजेच हॉटेलच्‍या मागील बाजूस, शेतात अशा विविध ठिकाणी गांजा ओढत आहेत.

अनेकांचे संसार उध्‍वस्‍त !

ज्‍या प्रमाणे दारू पिऊन अनेकांचे संसार उध्‍वस्‍त झाले आहेत त्‍याच प्रमाणे गांजा पिऊन सुध्‍दा अनेकांचे संसार उध्‍वस्‍त होत आहेत. दारू किंवा गांजाचे व्‍यसन करून दिवसभर अनेकजण गावात फिरतांना दिसत आहेत. अर्थातच हे लोक कुठलेही काम करत नसून दिवसभर नशेत असतात.

विविध ठिकाणाहून आयात !

कुंभार पिंपळगांवात गांजा विविध ठिकाणाहून येत असून एका ठिकाणाहून काही अडचण निर्माण झाल्‍यास दुसऱ्या ठिकाणावरून गांजा गावात येत असल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे. किमान 50 हजार ते 1 लाख रूपयांचा गांजा दररोज विक्री होत असल्‍याचा अंदाज नागरिकांनी व्‍यक्‍त केला आहे. याचाच अर्थ महिन्‍याला लाखो रूपयांचा गांजा विक्री होत आहे.

पोलीसांचा आशिर्वाद !

कुंभार पिंपळगांव हे शहर घनसावंगी पोलीस ठाण्‍या अंतर्गत येते. येथे पोलीस चौकी जरी असली तरी ही चौकी फक्‍त नावालाच उरलेली आहे. अवैध धंदे बिनधास्‍तपणे सुरू असून कोणाचाही धाक नाही. कुंभार पिंपळगांव व परिसरात गांजा विक्री करणारे कोण हे घनसावंगी पोलीस ठाण्‍याला माहित आहे.

कुंभार पिंपळगांवात मोठ्या प्रमाणात गांजा येत असतांना शिवाय विक्री करणारे कोण हे सुध्‍दा माहित असतांना स्‍थानिक पोलीस किंवा घनसावंगी पोलीस ठाणे कुठलीही कारवाई करत नाही याचाच अर्थ हप्‍ते बांधलेले आहेत अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड या प्रकरणी काही लक्ष देतात का हेच पाहणे महत्‍वाचे ठरणार आहे.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पहा…

महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!