Your Alt Text

बोलणारा पेन ? इंग्रजी किंवा कोणत्‍याही भाषेतून आपल्‍या भाषेत बोलणारा किंवा भाषांतर करणारा ट्रान्‍सलेटर पेन ! | Real Time Language Translator Pen

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
आपण जर दुसऱ्या राज्‍यात किंवा देशात गेल्‍यास तेथील भाषा आपल्‍याला समजत नाही, कोणी बोलत असेल तर तेही कळत नाही आणि तेथील भाषेतील पुस्‍तक किंवा वर्तमानपत्र सुध्‍दा आपल्‍याला समजत नाही, परंतू यावर विविध कंपन्‍यांनी भन्‍नाट कल्‍पनेचा वापर करून एक पेन (डिव्‍हाईस) बनवला आहे.

पेन मध्‍ये विशेष काय ?

आपण पेनचा वापर फक्‍त लिहीण्‍यासाठी करत असतो, मात्र आता असा डिजिटल पेन मार्केट मध्‍ये आला आहे जो विविध भाषेतील आवाज किंवा मजकूर तुमच्‍या भाषेत भाषांतर करून देतो. याचाच अर्थ हा पेन कोणत्‍याही भाषेतील मजकूर स्‍क्रीनवर दाखवतो किंवा आपल्‍याला ऐकायचे असल्‍यास बोलतो सुध्‍दा.

Scan Reader Pen

उदाहरणार्थ आपल्‍याला इंग्रजी भाषेतील पुस्‍तकाचा मजकूर हिंदी भाषेत भाषांतर करायचा असेल तर त्‍या पुस्‍तकातील मजकुरावर पेनचा समोरचा भाग फिरवल्‍यास पेन तो मजकूर स्‍कॅन करतो आणि आपल्‍याला ज्‍या भाषेत भाषांतर करून पाहीजे तो मजकूर पेनच्‍या स्‍क्रीनवर दिसून येतो.

दुसरा फायदा !

सदरील पेन फक्‍त मजकूर स्‍क्रीनवर दाखवत नाही तर आवाजात बोलूनही दाखवतो, उदाहरणार्थ समोरचा व्‍यक्‍ती जर इंग्रजीत बोलत असेल तर त्‍याच्‍या समोर हा पेन धरल्‍यास हा पेन सेकंदात भाषांतर करून आपण जी भाषा निवडली आहे त्‍या भाषेत ट्रान्‍सलेट करून आपल्‍याला ऐकवतो.

इतर सुविधा !

चार्जिंग द्वारे किमान 4 तास चालणाऱ्या या पेन मध्‍ये MP3 गाणे ऐकण्‍याचीही सोय असून, हेडफोन द्वारेही आवाज ऐकणे शक्‍य आहे शिवाय पेन मध्‍ये Wifi आणि ब्‍ल्‍यूटूथ सुध्‍दा आहे. यामध्‍ये आपण कोणाचाही आवाज रेकॉर्ड सुध्‍दा करू शकतो, शिवाय ट्रान्‍सलेट केलेला मजकूर सेव्‍ह करून कंप्‍यूटर मध्‍ये सुध्‍दा घेवू शकतो.

प्राप्‍त माहितीनुसार या पेन मध्‍ये 112 भाषांचा भाषांतर करण्‍याची सोय आहे. म्‍हणजेच भारतासह जगभरातील 112 भाषांचे भाषांतर करणे याद्वारे शक्‍य होत आहे. सदरील ट्रान्‍सलेट करणारे अनेक पेन मार्केट मध्‍ये आले असून प्रत्‍येका मध्‍ये वेगवेगळी सुविधा आणि भाषांची संख्‍या कमी जास्‍त आहे.

विद्यार्थ्‍यांसाठी फायद्याचे !

शाळेत शिकणारे विद्यार्थी अनेकदा इंग्रजीमुळे टेन्‍शन मध्‍ये दिसून येतात, परंतू जर त्‍यांच्‍याकडे इंग्रजीतून आपल्‍या भाषेत ट्रान्‍सलेशन करणारे पेन असेल तर पुस्‍तकातील मजकुरावर फक्‍त पेन फिरवला तर त्‍याचा अर्थ आपल्‍या भाषेत करणे शक्‍य आहे. युट्यूबवर याबाबत अनेक व्हिडीओ उपलब्‍ध आहेत.

किंमत किती ?

सध्‍या विविध भाषेतून ट्रान्‍सलेट करणारे पेन मार्केट मध्‍ये आले असून प्रत्‍येकाची किंमत वेगवेगळी आहे. सदरील ट्रान्‍सलेटर पेन मधील सुविधा अनुसार किंमत कमी अधिक दिसून येते, साधारण 10 हजारच्‍या पुढे या पेनाची किंमत आहे.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पहा…

महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!