एल्गार न्यूज :-
दारूचे सेवन करू नये म्हणून वारंवार सांगितले जाते, त्याचे दुष्परिणामही सांगितले जाते, दारूच्या अती सेवनामुळे मृत्यूचा धोकाही असतो हे सुध्दा सांगितले जाते, परंतू देशी आणि विदेशी दारू किंवा बिअरचे विक्रीचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे.
कोणत्याही प्रकारची दारू किंवा बिअरचे मद्यपान करण्यामुळे अनेक आजार उदभवू शकतात, ज्यांना ऱ्हदयाचा त्रास आहे त्यांनी तर तातडीने डॉक्टरांकडे गेले पाहीजे, शिवाय वर्षातून एकदा तरी तपासणी केली पाहीजे असे आवाहनही केले जाते, मात्र अनेक लोक या सूचनेकडे दुर्लक्ष करतांना दिसून येतात.
दारू विक्री वाढली !
मागील काही वर्षांपासून देशी विदेशी दारू, बिअर पिणाऱ्यांची संख्या वाढतांना दिसत आहे. यामध्ये तरूण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. थंडीच्या दिवसात दारू पिणे हाणिकारक असते, कारण या काळात दारू पिणे आरोग्यासाठी धोकादायक असते, यामुळे ऱ्हदया संबंधित अनेक आजार उदभवू शकतात.
जालना जिल्ह्यात किती विक्री !
प्राप्त माहितीनुसार जालना जिल्ह्यात मागील 11 महिन्यात 56 लाख 24 हजार लिटर देशी दारूची विक्री झाली आहे. तसेच 20 लाख 17 हजार लिटर विदेशी दारूची विक्री झाली आहे. शिवाय 17 लाख 80 हजार लिटर बिअरची विक्री झाली असल्याचे समोर आले आहे.
आरोग्यास धोका !
देशी विदेशी दारू, बिअर पिणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून तरूणाई या मध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. देशी विदेशी दारू पिणाऱ्यांचे प्रमाण अशाच प्रकारे वाढत राहील्यास समाजासाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल. अर्थातच असंख्य तरूण मद्पान करून आपले आयुष्य उद्ध्वस्त करत असल्याचे भयावह चित्र पहायला मिळत आहे.
31st ला तर…!
मागील 11 महिन्यात लाखो लिटर दारू विक्री झाली आहे, परंतू आता 31 डिसेंबर म्हणजे 31st च्या रात्री तर किती विक्री होणार याचा अंदाजही सध्या बांधणे अवघड आहे. नवीन वर्षाचे स्वागत देशी विदेशी दारू, बिअर पिऊन करण्याची तर परंपराच झाल्याचे भयावह चित्र वर्षानुवर्षे पहायला मिळत आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.