एल्गार न्यूज :-
Ladli Behna Yojana Maharashtra : नुकतंच मध्यप्रदेश मध्ये निवडणुका संपल्या असून यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे, मध्यप्रदेश मध्ये भाजपला मिळालेल्या विजयात शिवराजसिंग चौहान यांनी सुरू केलेल्या लाडली बहना योजनेचा महत्वपूर्ण वाटा असल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे लाडली बहना योजना ?
मध्यप्रदेश राज्यात शिवराजसिंह चौहान यांनी मागील काळात महिलांसाठी लाडली बहना योजना सुरू केली होती, या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहिना 1250 रूपये दिले जात होते. ही योजना मध्यप्रदेश मध्ये खूप गाजली होती.
लाडली बहना योजना सुरू केल्यामुळे महिलांना दरमहा 1250 रूपये मिळू लागल्याने महिलांमध्ये शिवराजसिंह चौहान यांच्या सरकार विषयी सकारात्मक संदेश जावून त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाल्याचे विश्लेषकांचे मत आहे. अनेकांना ही योजना गेमचेंजर ठरल्याचे वाटत आहे.
लाडली बहना योजनेच्या माध्यमातून मध्यप्रदेश राज्यातील जवळपास 1 कोटी 31 लाख महिलांना फायदा झाल्याचे सांगण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिलांना झालेला फायदा निवडणुकीवर परिणाम करणारा ठरल्याचे अनेकांचे मत आहे.
महाराष्ट्रातही लाडली बहना योजना ?
मध्यप्रदेश मध्ये शिवराजसिंह चौहान यांना लाडली बहना योजनेच्या माध्यमातून मोठा फायदा झाल्याचे दिसून येत असल्यामुळे आता महाराष्ट्र सरकार सुध्दा ही योजना राज्यात लागू करण्याचा विचार करत असल्याचे माध्यमांमधून समोर येत आहे.
याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते वैजिनाथ वाघमारे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार भारतीय जनता पार्टीला मध्यप्रदेशात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या लाडली बहना योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे. इतर राज्यही या योजनेकडे बारकाईने लक्ष देत आहेत. लाडली बहना योजनेची माहिती घेवून सदरील योजना महाराष्ट्रात लागू करता येईल का याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Ladli Behna Yojana Maharashtra
लाडली बहना योजना महाराष्ट्रातही लागू झाल्यास त्याचा फायदा होईल अशी आशा महायुतीच्या अनेक नेत्यांना आहे. राज्यात ही योजना लागू झाल्यास महिलांना दिलासा मिळेल आणि त्याचे रूपांतर निवडणुकीच्या निकालावर होईल अशी आशा संबंधित नेत्यांना आहे. त्यामुळे राज्य सरकारच खरंच ही योजना राज्यात लागू करते का हे पुढील काळात लक्षात येईलच, मात्र नेते या योजने बद्दल गांभिर्याने विचार करत असल्याचे दिसत आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.