एल्गार न्यूज :-
Mahindra CNG Tractor : दिवसेंदिवस शेती मध्ये विविध बदल पहायला मिळत आहे, पारंपारिक पध्दती ऐवजी आता आधुनिक पध्दतीने शेती करण्यास प्राधान्य दिले आहे, यामुळे आधीच्या तुलनेत फायदा तर होतच आहे शिवाय मेहनतही कमी करावी लागत आहे.
शेती मध्ये बैलांचा वापर कमी कमी होत चालला असून शिवाय आधुनिक पध्दतीमुळे कमी मजुरांमध्ये सुध्दा शेतीची कामे केली जात आहे. आधीच्या तुलनेत शेतकरी ट्रॅक्टरचा वापर अधिक करू लागले आहेत, कारण कमी वेळेत जास्त काम या ट्रॅक्टरमुळे करणे शक्य होत आहे.
Mahindra CNG Tractor
देशातील ट्रॅक्टर बनवणारी मोठी व प्रमुख कंपनी असलेल्या महिंद्राने सीएनजीवर आधारीत ट्रॅक्टर लॉन्च केले आहे, म्हणजेच CNG गॅसवर हे ट्रॅक्टर चालणार आहे. ज्यामुळे इंधनाची बचत होणार आहे.
सध्या देशात डिझेलवर चालणारे ट्रॅक्टर आहेत. डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचा बराच खर्च होत असतो, ही बाब लक्षात घेवून महिंद्रा कंपनीने सीएनजी गॅसवर आधारित ट्रॅक्टर लॉन्च केला आहे.
सदरील CNG Tractor मध्ये 24 किलोग्रॅम गॅस ठेवण्याची क्षमता आहे. सदरील सीएनजी ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचे प्रति तास 100 रूपयांची बचत होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत सुमारे 70 टक्के उत्सर्जन कमी करेल.
सीएनजी ट्रॅक्टरच्या इंजिनचे कंपन कमी असल्यामुळे ट्रॅक्टरचा आवाज देखील कमी आहे. शिवाय सीएनजीमुळे वायू प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होते. हा ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टर प्रमाणेच विविध प्रकारची शेती आणि वाहतुकीची कामे करण्यास सक्षम असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
नागपूर येथे एग्रोव्हिजन या कृषि प्रदर्शनामध्ये सदरील ट्रॅक्टर लॉन्च करण्यात आला असून यावेळी केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. कंपनी हा ट्रॅक्टर देशातील सर्व भागात उपलब्ध करून देणार आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.