एल्गार न्यूज :-
फेसबुकचे फेक अकाउंट तयार करून मित्रांना पैशांची मागणी करण्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील प्रशांत बुरसे (जैन) यांचे फेसबुकवर Prashant Jain या नावाने अकाउंट आहे, त्यांच्या मित्रांच्या यादीत 3655 मित्र आहेत, ते जास्त करून फेसबुक वापरत नाहीत.
प्रशांत बुरसे (जैन) यांच्या नावानेच आणि त्यांच्या प्रोफाईलला असलेला फोटो वापरून जशास तसे दुसरे अकाउंट अज्ञात व्यक्तीने तयार केले असून या फेक अकाउंट मध्ये 23 मित्र दिसत आहेत.
बनावट अकाउंट बनवणाऱ्या व्यक्तीने फेसबुक मॅसेंजर मधून प्रशांत बुरसे यांच्या मित्रांना मी अडचणीत असून पैशांची गरज असल्याचे मॅसेज केले असून एक क्रमांक दिला आहे ज्यावर गुगल पे द्वारे पैसे ट्रान्सफर करण्याची विनंती केली आहे.
प्रशांत बुरसे यांना त्यांच्या मित्रांनी प्रत्यक्ष मोबाईलवर कॉल करून विचारणा केल्यावर हा सर्व प्रकार लक्षात आला. अज्ञात व्यक्तीने फोन पे साठी दिलेला नंबर सध्या बंद दिसत आहे. सदरील गंभीर प्रकार लक्षात आल्यानंतर प्रशांत बुरसे यांनी थेट घनसावंगी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.
फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून मित्रांना पैसे मागणाऱ्या व्यक्तीने अनेकांना पैशांसाठी मॅसेज केला असण्याची शक्यता आहे, शिवाय या व्यक्तीने इतर अनेकांनाही फसवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे या गंभीर प्रकरणाचा तपास होणे अत्यंत गरजेचे आहे.
पैसे पाठवू नये !
अज्ञात व्यक्ती विरूध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे. फेसबुक किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माझ्या नावाने मॅसेज आल्यास किंवा पैशांची मागणी केल्यास कोणालाही पैसे पाठवू नये, असे आवाहन प्रशांत बुरसे यांनी केले आहे.
पोलीस तपास करणार का ?
सदरील प्रकरण गंभीर असून अज्ञात व्यक्तीने अनेकांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सायबर क्राईम पोलीसांनी गुगल पे साठी दिलेला मोबाईल क्रमांक व आयपी अॅड्रेस तसेच इतर पुराव्या आधारे संबंधित आरोपीचा तात्काळ शोध घेणे आवश्यक आहे.
सायबर क्राईम करणाऱ्या गुन्हेगारांनी पोलीसांसमोर पुन्हा एकदा आव्हान उभे केल्याचे दिसत असून पोलीसांनी अशा आरोपींना तात्काळ अटक करणे आवश्यक आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनीही या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देवून तपास लवकर करून आरोपीला अटक करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देणे क्रमप्राप्त झाले आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.