एल्गार न्यूज :-
राज्यातील ग्रामपंचायतसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज दि.17 रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये ग्रामपंचायतींना निधी वाढवून देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.
मंत्रिमंडळ निर्णय :-
सदरील झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये राज्यातील शिक्षण संस्था समुह विद्यापीठ स्थापन करू शकतात हा निर्णय झाला, दुसरा निर्णय राज्याला 1 ट्रिलीयन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी परिषदेने केल्या आहेत, त्यानुसान निर्णय घेण्यात आले.
तसेच मंगरूळपीर येथील सत्तर सावंगा बॅरेजला मान्यता देण्यात आली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरू करण्याबाबतही निर्णय झाला. तसेच ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवून देण्याबाबत निर्णय झाला.
ग्रामपंचायतसाठी किती निधी मिळणार ?
स्वतंत्र इमारत नसलेल्या 2000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 15 लाख ऐवजी 20 लाख रूपये व 2000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 18 लाख ऐवजी 25 लाख अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
तसेच यापूर्वी ग्रापंचायत स्वनिधीची असलेली अट देखील रद्द करण्यात आली आहे. ग्रामपंचायत बांधकामासाठी यापेक्षा अधिक निधीची आवश्यकता असल्यास अतिरिक्त निधी केंद्र व राज्य शासनाच्या इतर योजना, वित्त आयोग निधी, जिल्हा ग्राम विकास निधी, स्थानिक विकास निधी (खासदार, आमदार निधी) इ. बाबींमधून देण्यात येईल.
तसेच बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. आता ही योजना 2027-28 या वर्षापर्यंत राबविण्यात येईल.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.