Your Alt Text

पीएम किसानचा 2000 चा हप्‍ता या तारखेला खात्‍यात जमा होणार ! पण हे काम करणे आवश्‍यक ! | PM Kisan 15th Installment Date 2023

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
PM Kisan 15th Installment Date 2023 : पीएम किसान योजनेचा 15 वा हप्‍ता कधी मिळणार म्‍हणून शेतकरी वाट पाहात आहेत. मात्र आता दिवाळीच्‍या निमित्‍ताने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपणार आहे कारण शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात आता 15 वा हप्‍ता जमा केला जाणार आहे.

GP KP

आपल्‍याला माहितच आहे की, केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सम्‍मान निधी ही योजना सुरू केलेली आहे, या योजनेच्‍या माध्‍यमातून देशभरातील शेतकऱ्यांना वर्षाला 2 हजाराचे 3 हप्‍ते दिले जातात, म्‍हणजेच एका वर्षात शेतकऱ्याला 6000 रूपये दिले जातात.

पीएम किसान योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात जमा केले जातात. नुकतंच राज्‍य सरकारच्‍या Namo Shetkari Mahasanman Nidhi या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात 2 हजार रूपये जमा करण्‍यात आले आहेत. आता केंद्र सरकारचे 2 हजार रूपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

याआधी PM Kisan Samman Nidhi Yojana चा 14 वा हप्‍ता 27 जुलै 2023 रोजी शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात जमा करण्‍यात आला होता, 2000 हजार रूपये तशी जास्‍त रक्‍कम नसली तरी या माध्‍यमातून देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना काही अंशी का असेना दिलासा मिळत असतो.

000dfasdsa0001

PM Kisan 15th Installment Date 2023

पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात 15 वा हप्‍ता केव्‍हा जमा होणार याबाबत केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

त्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार पीएम किसान सम्‍मान निधी योजनेचा 15 वा हप्‍ता 15 नोव्‍हेंबर 2023 रोजी म्‍हणजेच बुधवारी शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात जमा होणार आहे.

तुम्‍हाला 2000 चा हप्‍ता मिळणार किंवा नाही ? येथे चेक करा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!