Your Alt Text

स्‍वातंत्र्याच्‍या 76 वर्षानंतरही आपले मुलभूत प्रश्‍न सुटले आहेत का ? | Basic Problems of Common Man

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज विशेष :- Basic Problems of Common Man :- देश प्रगतीच्‍या वाटेवर आहे, आपण अनेक क्षेत्रात आपल्‍या देशाचा ठसा उमटवला आहे, अनेक क्षेत्रात आपली कौतुकास्‍पद कामगिरी सुध्‍दा आहे याचे नक्‍कीच समाधान आहे. परंतू स्‍वातंत्र्याच्‍या 76 वर्षानंरतही आपण सर्वसामान्‍य माणसाचे मुलभूत प्रश्‍न सोडवण्‍यात यशस्‍वी झालो आहोत का ? हा एक मोठा प्रश्‍न आहे.

शेअर मार्केट वर गेले की खाली आले, जीडीपीचा ग्रोथ कमी होत आहे की जास्‍त होत आहे, एखाद्या चित्रपटाने हजार कोटी कमवले अशा मुद्यांशी गोरगरीब व सर्वसामान्‍य जनतेला काय देणेघेणे आहे. गरीब व सर्वसामान्‍य माणूस आज फक्‍त हे पाहत आहे की, त्‍याचे प्रश्‍न, त्‍याच्‍या समस्‍या कशा सूटतील आणि त्‍याला सामान्‍य जीवन सुख समृध्‍दीने कसे जगता येईल. सर्वसामान्‍य जनतेशी संबंधित काही प्रश्‍न आहेत ते पाहुया…

शिक्षण व्‍यवस्‍था :-

मुळ प्रश्‍न हा असतो की, आपण लोकप्रतिनिधींना निवडून का देत असतो ? त्‍याचे कारण म्‍हणजे आपल्‍या समस्‍या सुटल्‍या पाहीजेत, आपले प्रश्‍न मार्गी लागले पाहीजेत, ज्‍यामध्‍ये केजी टू पीजी म्‍हणजेच पूर्व प्राथमिक पासून ते पदव्‍युत्‍तर पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळायला हवे, मग ते कोणत्‍याही प्रकारचे शिक्षण असो हे शिक्षण मोफत असायला हवे.

अनेकांना वाटेल असं कुठं असतं का, तर जगभरात अनेक देशात मोफत उच्‍च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत आहे. एवढंच काय तर आपल्‍या देशाची राजधानी असलेल्‍या दिल्‍ली मध्‍ये सुध्‍दा जवळपास सर्व प्रकारचे शिक्षण मोफत आहे आणि विशेष म्‍हणजे हे शिक्षण खाजगी शाळा, महाविद्यालयांपेक्षा अधिक दर्जेदार आहे.

आरोग्‍याचा प्रश्‍न :-

आजही आपल्‍याकडे आरोग्‍य व्‍यवस्‍था पाहीजे तशी मजबूत नाही, विशेष करून गोरगरीब व सर्वसामान्‍य नागरिकांना चांगल्‍या दर्जाची आरोग्‍य सुविधा मिळत नाही, ग्रामीण भागात तर परिस्थिती अधिकच गंभीर दिसून येते. खाजगी दवाखान्‍यात पैसे घालण्‍याशिवाय पर्याय नसतो. त्‍यामुळे आरोग्‍याच्‍या प्रश्‍नही महत्‍वाचा आहे.

बेरोजगारांचे वाढते प्रमाण :-

आजही बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते, गाव असो की शहर सगळीकडेच बेरोजगारांची संख्‍या मोठ्या प्रमाणावर आहे. उच्‍च शिक्षण घेवून सुध्‍दा नोकरी नाही, त्‍यामुळे कुटुंबाचा प्रपंच कसा चालवायचा, सुख दुख या गोष्‍टींसाठी लागणारा पैसा कोठून आणायचा असा प्रश्‍न पडतो. त्‍यामुळे रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध होणे आवश्‍यक आहे.

कर्ज पुरवठा :-

एक तर उच्‍च शिक्षण घेवूनही नोकऱ्या नाहीत, दूसरीकडे स्‍वत:चा छोटा मोठा व्‍यवसाय करावा तर भांडवल नाही, बँकाकडे गेल्‍यास बँका शक्‍यतो नकार देतात, अशा कागदपत्रांची मागणी केली जाते ज्‍या कागदपत्रांची पूर्तता सहज होणे शक्‍य नाही. किंवा कागदपत्रांची पूर्तता केल्‍यानंतरही चपला घासेपर्यंत चकरा मारल्‍या तरी कोणतेही कारण देवून परत पाठवले जाते. त्‍यामुळे व्‍यवसाय करण्‍यासाठी सहजतेने कर्जपुरवठा होणे आवश्‍यक आहे.

महिला सुरक्षा व सक्षमीकरण :-

महिला व मुलींची सुरक्षा आणि सक्षमीकरण याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मुलींना उच्‍च शिक्षणाची संधी मिळणे, रोजगाराच्‍या संधी मिळणे, महिला व मुलींना योग्‍य ती सुरक्षा आणि चांगले वातावरण मिळणे आवश्‍यक आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्‍न :-

शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्‍हटले जाते, मात्र आज शेतकरीच संकटात सापडलेला आहे, दिवसरात्र मेहनत करूनही मुद्दल पैसे सुध्‍दा हातात पडतांना दिसत नाहीत, शेतमालाला हमी भाव नाही, माल विक्री करण्‍यासाठी योग्‍य ती व्‍यवस्‍था नाही. शेतकऱ्यांना आधुनिक पध्‍दतीचे प्रशिक्षण, मागणी आणि पुरवठा याचे गणित आणि शेतमालाला योग्‍य तो भाव मिळाल्‍यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

सरकारी योजनांचा लाभ :-

सरकार विविध योजना सुरू करत असते, मात्र त्‍या योजनांचा लाभ तळागाळातील सर्व लोकांना मिळतो का हा एक प्रश्‍नच आहे. अनेकांना लाभ मिळतो परंतू अनेकजण असे असतात त्‍यांच्‍यापर्यंत योजना पोहोचतच नाही, योजनांचा लाभ मिळवण्‍यासाठी अनेक चकरा मारल्‍या तरी त्‍याचा लाभ मिळत नाही, त्‍यामुळे सहजतेने योजनांचा लाभ मिळण्‍यासाठी यंत्रणा सक्षम करणे आवश्‍यक आहे.

उद्योग व्‍यवसायांना प्रोत्‍साहन :-

ग्रामीण भागात म्‍हणजेच गाव पातळीवर नव्‍हे तर तालुका पातळीवर सुध्‍दा आपण उद्योग धंदे उभे करू शकलेलो नाहीत, अपवाद नक्‍कीच आहेत. परंतू आजघडीला प्रत्‍येक तालुक्‍याचा विचार केल्‍यास तालुकास्‍तरावर Mini MIDC किंवा छोटे उद्योग, कंपन्‍या सुरू झाल्‍यास मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्‍ध होवू शकतो. इतर कंपन्‍या इच्‍छुक नसतील तर जिल्‍ह्यातील, तालुक्‍यातील उद्योजक कसे निर्माण होतील याकडेही राज्‍यकर्त्‍यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

मुलभूत प्रश्‍न :-

गाव असो की शहर असो, रस्‍ते, पाणी, स्‍वच्‍छता, आरोग्‍य, शासकीय योजनांचा लाभ, लागणारे प्रमाणपत्र, कागदपत्र यासह सर्वांगिण विकासाची कामे होणे आवश्‍यक आहे. कारण हे मुलभूत प्रश्‍न आजही सगळीकडे दिसून येतात. त्‍यामुळे शासन, प्रशासन, नेते, लोकप्रतिनिधी आणि जनतेच्‍या सामुहिक प्रयत्‍नांची नितांत आवश्‍यकता आहे.

परवेज पठाण,
संपादक, एल्‍गार न्‍यूज

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!