एल्गार न्यूज :-
मोदी सरकार अर्थात केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सम्मान निधी ही योजना सुरू केलेली आहे, सदरील योजने अंतर्गत देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे, परंतू या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषाची पूर्तता करणे आवश्यक आहे.
PM Kisan Samman Nidhi
केंद्र सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 2 हजाराचे 3 हप्ते दिले जातात, म्हणजे वर्षाला 6 हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात, मात्र आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकषाची पूर्तता करणे बंधनकारक आहे.
अनेक शेतकऱ्यांना 14 वा हप्ता सुध्दा मिळालेला नाही, कारण त्यांनी निकषाची पूर्तता केली नव्हती, आता पीएम किसान योजना 15 वा हप्ता लवकरच येणार आहे, त्यामुळे सदरील हप्ता प्राप्त करायचा असल्यास खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
2000 चा हप्ता कोणाला नाही मिळणार ?
पीएम किसान योजने अंतर्गत 15 वा हप्ता प्राप्त करण्यासाठी लाभार्थ्यांना 3 निकषाची पूर्तता करावी लागणार आहे. पहिली अट म्हणजे त्यांना E-kyc करणे आवश्यक आहे. दूसरी अट म्हणजे बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे, आणि तिसरी अट म्हणजे जमीन लिंक करणे किंवा पडताळणी करणे आवश्यक आहे.
जर शेतकऱ्यांनी तिन्ही गोष्टींची पूर्तता यापूर्वीच केलेली असेल तर त्यांना पुन्हा या अटीची पूर्तता करण्याची आवश्यकता नाही. ई-केवायसी मोबाईलवर किंवा CSC केंद्रावर सुध्दा करता येते, बँक खाते आधारशी लिंक करण्यासाठी बँकेला विनंती करावी लागेल किंवा पोस्टात सुध्दा नवीन खाते उघडून त्यास आधारशी लिंक करता येईल. जमीन लिंक किंवा पडताळणीसाठी तहसिल किंवा कृषि विभागाशी संपर्क साधता येईल.