Your Alt Text

मोदी सरकारची दिवाळीभेट ! या नागरिकांना मिळणार 5 वर्षे मोफत रेशन ! | PM Garib Kalyan Anna Yojana

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
PM Garib Kalyan Anna Yojana : दिवाळीच्‍या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोट्यावधी नागरिकांना एक प्रकारे दिवाळी गिफ्ट दिले असून आता पुढील 5 वर्षांसाठी लाभार्थ्‍यांना मोफत रेशन मिळणार आहे. त्‍यामुळे देशातील कोट्यावधी नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

सदरील मोफत रेशनचा लाभ प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजने अंतर्गत दिला जाणार आहे. छत्‍तीसगढ येथे झालेल्‍या एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. मोदी सरकारच्‍या या निर्णयामुळे देशातील कोट्यावधी नागरिकांना याचा फायदा होणार असल्‍याचे दिसत आहे.

छत्‍तीसगड येथील सभेत बोलतांन पंतप्रधान नरेंदी मोदी यांनी सांगितले की, आमच्‍या सरकारने आता देशातील 80 कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देण्‍याची योजना आणखी 5 वर्षे वाढवण्‍याचा निर्णय घेतला आहे, तुमचे प्रेम आणि आशिर्वाद मला नेहमी पवित्र निर्णय घेण्‍याचे बळ देत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

पंतप्रधान गरीब कल्‍याण अन्‍न योजने अंतर्गत लाभार्थी प्रती व्‍यक्‍तीला 5 किलो गहू किंवा तांदूळ मिळतो, अर्थातच हे धान्‍य मोफत दिले जाते, ही योजना डिसेंबर 2023 मध्‍ये संपणार होती, मात्र आता मोदी सरकारने या योजनेला पुढील 5 वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे, त्‍यामुळे कोट्यावधी नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

PM Garib Kalyan Anna Yojana

कोरोना काळात सदरील पंतप्रधान गरीब कल्‍याण अन्‍न योजना सुरू करण्‍यात आली होती, कोरोना महामारीनंतर लॉकडाउनसह अनेक निर्बंध लावण्‍यात आले होते त्‍यामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले होते, विशेषत: गोरगरीबांना खाण्‍यापिण्‍याच्‍या बाबतीत अनेक संकटांचा सामना करावा लागला होता अशा परिस्थितीत मोदी सरकारने गरीब लोकांच्‍या मदतीसाठी ही योजना सुरू केली होती, आता त्‍याला 5 वर्षे मुदतवाढ देण्‍यात आली आहे.

योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

सरकारी योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!