Your Alt Text

कुंभार पिंपळगांव सर्कल मध्‍ये गावोगावी अवैध दारू पार्सल होत असतांना पोलीसांसह उत्‍पादन शुल्‍क विभाग झोपा काढतंय का ? | Illegal Sale of liquor

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांवात मागील काळात अनेक लोकांच्‍या बाईक (मोटरसायकल) आणि मोबाईल चोरीला गेले आहेत, परंतू अद्याप कोणत्‍याच चोरीचा थांगपत्‍ता पोलीसांना लागलेला दिसत नाही. जर पोलीसांनी एवढ्या चोरीच्‍या घटनांपैकी एकही तपास लावला असेल तर त्‍यांनी जाहीर करावे अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.

मागील काळात कुंभार पिंपळगांव शहरातून विशेष करून बुधवार आठवडी बाजाराच्‍या दिवशी अनेकांच्‍या मोटारसायकली चोरीला गेल्‍या आहेत, एवढंच नव्‍हे तर बाजारा मधून बघता बघता मोबाईल क्षणात लंपास करण्‍यात आले होते, अनेकांनी पोलीसांकडे तक्रारही केली होती, मात्र त्‍याचे पुढे काहीही झाले नाही.

एका व्‍यक्‍तीने तर पोलीस ठाण्‍यात तक्रार नोंदवून त्‍यास ऑनलाईन तक्रार केंद्र शासनाच्‍या पोर्टलवर नोंद सुध्‍दा केली होती, या पोर्टलच्‍या आधारे कधीही मोबाईल सुरू झाल्‍यास त्‍याचा तपास लावणे शक्‍य असल्‍याचे सांगितले जात होते, परंतू तरीही त्‍या मोबाईलचा तपास लागलेला नाही.

लाखमोलाची गाडी :-

ज्‍या लोकांनी कष्‍ट करून, पैसे जमा करून बाईक अथवा मोटारसायकल घेतली होती, त्‍यांची मोटरसायकल अवघ्‍या काही क्षणात लंपास करण्‍यात आल्‍यावर त्‍या व्‍यक्‍तीला किती मोठा हादरा बसत असेल. ज्‍यांनी इंशुरन्‍स केले आहे त्‍यांना काही थोडाफार फायदा कंपन्‍या देतील का हा प्रश्‍न आहे. अनेकांनी तर इंशुरन्‍स संपल्‍यावर ते रिन्‍यु सुध्‍दा केलेले नसते, त्‍यामुळे एकदा गाडी चोरीला गेली तर त्‍याचा कुठलाही मोबदला त्‍यांना मिळत नसल्‍याचे सांगितले जाते.

सध्‍या कोणत्‍याही गाडीची किंमत जवळपास एक लाखाच्‍या आसपास आहे, जर अशा प्रकारे गरीब व सर्वसामान्‍य माणसाची लाखमोलाची गाडी चोरीला जात असेल तर त्‍या माणसाने करायचे काय ? पोलीसांना विचारणा केल्‍यास तपास सुरू असल्‍याचे सांगितले जाते, परंतू महिनोमहिने तपासच होत नाही आणि गाडीही सापडत नाही.

खिशातून मोबाईल गायब :-

आठवडी बाजाराच्‍या दिवशी अनेकांना असा अनुभव आला आहे की, भाजीपाला खरेदी करण्‍यासाठी ते बाजारात गेले असतांना आणि भाजीपाला खरेदी करतांना अवघ्‍या काही क्षणात त्‍यांचा मोबाईल गायब झाल्‍याचे त्‍यांना दिसून आले.

मोटरसायकल आणि मोबाईल चोरीच्‍या कुंभार पिंपळगावात अनेक घटना घडल्‍या आहेत, परंतू (एखादा अपवादच असेल) अद्याप कोणत्‍याही वस्‍तूचा तपास लागलेला दिसून येत नाही. नागरिकांना तर असा संशय आहे की, चोरांचे आणि स्‍थानिक पोलीसांचे काही साटेलोटे तर नाही ना ?

ज्‍या पध्‍दतीने मागील काळात मोटरसायकल आणि मोबाईल चोरीला गेले आहेत त्‍यातून असे दिसून येते की, चोरांचा एक मोठा नेटवर्क यामध्‍ये सामिल असण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे जर असा काही नेटवर्क असेल तर त्‍याला उध्‍वस्‍त करण्‍याचे मोठे आव्‍हान पोलीसांसमोर आहे.

तपास इतरांकडे द्यावा !

घनसावंगी पोलीस ठाण्‍या अंतर्गत घडणारे गुन्‍हे नक्‍कीच चिंताजनक आहे. कारण या ठाण्‍या अंतर्गत तपासाची टक्‍केवारी नगण्‍यच दिसून येते. जर पोलीस अधिक्षक शैलेष बलकवडे यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आणि एलसीबी आणि संबंधित यंत्रणेला याचा तपास करण्‍याचे निर्देश दिले तर चोरट्यांचा तपास लागू शकतो अशी प्रतिक्रियाही नागरिक देत आहेत.

गुन्‍ह्याची नोंदच नाही !

घनसावंगी पोलीस ठाण्‍या अंतर्गत अनेक गुन्‍ह्याची नोंदच होत नसल्‍याचे दिसून येत आहे. एखादा व्‍यक्‍ती मोबाईल चोरीची तक्रार करायला गेल्‍यास मोबाईल कुठे सापडत असतो का ? असा प्रश्‍न उलट फिर्यादीलाच केला जातो.

शिवाय इतर गुन्‍हे सुध्‍दा नोंदवण्‍यास टाळाटाळ केली जाते अथवा गुन्‍हे नोंद होवू नये म्‍हणून प्रयत्‍न केले जातात, कारण आमच्‍या पोलीस ठाण्‍या अंतर्गत जास्‍त गुन्‍हे घडत नाहीत असा संदेश वरिष्‍ठांना दिला जातो आणि शाब्‍बासकी मिळवली जाते.


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

सरकारी योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!