एल्गार न्यूज :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे मराठा समाज बांधवांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला, यावेळी अंबड पाथरी रोडवरील कृषि उत्पन्न बाजार समिती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे, त्यांना सपोर्ट देण्याच्या दृष्टीने राज्यभरात मराठा समाज बांधवांकडून साखळी उपोषण, रास्ता रोको, तसेच गाव, शहर बंद ठेवून आपल्या भावना व्यक्त करण्यात येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून त्यांची तब्येतही खालावली आहे, सरकारकडून तातडीने दखल घेतली जात नसल्याने मराठा समाजाच्या तिव्र भावना आहेत, समाजात मोठ्या प्रमाणात रोष पहायला मिळत आहे.
रास्ता रोको आंदोलन !
कुंभार पिंपळगांव येथे दि.31 रोजी कुंभार पिंपळगांव कडकडीत बंद ठेवण्यात आला, यावेळी मराठा आंदोलकांनी कृषि उत्पन्न बाजार समिती चौकात रोको आंदोलन केले, यावेळी एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाचे बापाचे… इत्यादी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
सदरील रास्ता रोको दरम्यान अनेक आंदोलकांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे, सरकारने तात्काळ मराठा आरक्षण देण्यासंदर्भात पाऊले उचलावीत, टिकणारे आरक्षण द्यावे यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शाळा बंद !
कुंभार पिंपळगांव व परिसरातील शाळा आज बुधवार दि.31 व गुरूवार दि.1 असे दोन दिवस बंद ठेवण्यात येत आहे. मात्र बुधवारी व्यापारी मार्केट सुरू राहणार आहे.
योजना व इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.