Your Alt Text

वाळू माफीयांनी पोलीसांसह महसूल प्रशासनाला खिशात ठेवलंय का ? प्रशासनाच्‍या नाकावर टिच्‍चून वाळू तस्‍करी | Illegal Sand Transport

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथून वाळूची भरधाव वेगाने जाणारी वाहने पाहून नागरिकांना अनेक प्रश्‍न पडले आहेत. मार्केट मधून धुळ उडवत बेभानपणे वाळूची जाणारी वाहने नेमका काय संदेश देत आहेत याचीच चर्चा सुरू आहे.

गोदा पात्रातून वाळूची सर्रासपणे होत असलेली वाळू तस्‍करी अनेक प्रश्‍नचिन्‍ह निर्माण करत आहे. मोठमोठी वाळूची वाहने कुंभार पिंपळगांव मधून रात्री मार्केट मधून भरधाव वेगाने जात असतांना त्‍यांना कोणाचाही धाक राहीला नसल्‍याचे दिसून येत आहे.

प्रशासनाला जणू खिशात ठेवल्‍याच्‍या अविर्भावात वाळू माफीयांचा हैदोस सुरू आहे. पोलीसांसह महसूल प्रशासनाच्‍या समोरून भरधाव वेगाने जात असतांना मात्र अधिकारी कर्मचारी फक्‍त बघ्‍याची भुमिका घेत असल्‍याने नेमकं चाललंय काय असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

गोदापात्रातून सुरू असलेली वाळूची अवैध वाहतुक ही काही दहा पाच हजाराची नाही, तर लाखो रूपयांची आहे. मात्र महसूल प्रशासन किंवा पोलीस प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करत असल्‍याचे चित्र पहायला मिळत आहे.

हप्‍ते कोणा कोणाला जातात ?

वाळू माफीयांचे कोणाकोणला हप्‍ते जातात, त्‍यांनी कोणाचे खिसे गरम केले आहेत, कार्यवाही आधीच वाळू माफीयांना कोण टीप देतो, जागोजागी नेमलेले लोकेशन देणारे एजंट कोण आहेत ? महसूल आणि पोलीस प्रशासनाच्‍या गाड्या बाहेर पडल्‍या की त्‍यांचा पाठलाग करणारे एजंट कोण आहेत ? याचा तपास वरिष्‍ठांनी करणे गरजेचे आहे. कारण पाणी कुठं तरी मुरतंय हे ही तितकेच खरे.

एक दोन कर्मचारी पाठवून वाळूमाफीयांना रोखता येईल का ?

महसूल किंवा पोलीस प्रशासनातील एक दोन कर्मचारी पाठवून वाळूमाफीयांना रोखता येईल का ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शक्‍यतो पोलीस आणि महसूल प्रशासन एकत्र कार्यवाही करतांना दिसत नाही किंवा दोघांमध्‍ये समन्‍वय नाही.

एकाचवेळी अनेक कर्मचारी जर कार्यवाही करण्‍यास गेल्‍यास नक्‍कीच वाळू माफीयांना चाप बसू शकतो, त्‍यांच्‍यावर कार्यवाही होवू शकते, परंतू तेरी भी चुप मेरी भी चुप अशी सध्‍याची अवस्‍था असल्‍यामुळे कोणीच पुढे येतांना दिसत नाही. थातूर मातूरपणे एखादी कार्यवाही करून स्‍वत:ची पाठ थोपटली जाते.

वाळूमाफीयांची वर पर्यंत लिंक ?

ज्‍या अविर्वाभावात वाळू माफीया वाळू तस्‍करी करीत आहेत आणि ज्‍या प्रकारे त्‍यांना कोणीही रोखणारे दिसत नाही त्‍यानुसार त्‍यांची वरपर्यंत लिंक असल्‍याची चर्चा ऐकायला मिळत आहे, खरंच जर वर पर्यंत लिंक असेल तर वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी याचा तपास करणे गरजेचे आहे, कारण हा तपास नाही केला तर संशयाच्‍या भोवऱ्यात ते पण येतात हे वरिष्‍ठांनी लक्षात घ्‍यावे.

योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

सरकारी योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!