Your Alt Text

कृषी क्रांती संस्‍थेच्‍या वतीने जालना येथील विद्यालयात वृक्षारोपण !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
कृषी क्रांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालना यांच्‍या वतीने आयोजित “एक पेड माँ के नाम” या मोहीमे अंतर्गत दि.२८ रोजी श्री महावीर स्थानकवासी जैन माध्यमिक आणि उच्च माध्यम विद्यालय जालना येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी शाळेतील NCC ग्रुप 50 महाराष्ट्र बटालियन जालना चे विद्यार्थीनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील प्राचार्य शांतीलाल वानगोता सरांनी विद्यार्थ्यांना झाडे लावा झाडे जगवा या विषयावर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी प्राचार्य शांतीलाल वानगोता, NCC प्रमुख अमोल मोहिते, वैशाली इंदानी, कृषी क्रांती सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष-सतीश मुसळे, उपाध्यक्ष-गजानन पालवे, सचिव-रितेश देशमुख, नितीन जऱ्हाड, राम खाडे यांच्‍यासह शिक्षक व मान्‍यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरानी मोठ्या संख्येने वृक्षारोपणामध्ये सहभाग घेतला.

संस्थेच्या या वर्षीच्या उद्दिष्ट्यामध्ये जवळपास 11111 झाडे लावण्याचा माणस आहे. जून ते जुलै या दोन महिन्या पासून संस्‍थेच्या माध्यमातून झाडे लावायचे काम चालू असून संस्थेने आजपर्यंत 5540 झाडे लावले असल्‍याचे संस्‍थेच्‍या वतीने सांगण्‍यात आले आहे.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!