Your Alt Text

कुंभार पिंपळगांवचा प्रबुद्धराज गायकवाड उच्‍च शिक्षणासाठी ऑस्‍ट्रेलियाला ! अल्‍पसंख्‍याक विद्यार्थी शिष्‍यवृत्‍ती योजना

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राषन करील तो गुरगुरल्‍याशिवाय राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे सर्वात शक्तिशाली साधन मानले. त्यांचे मत होते की, शिक्षणाने व्यक्तीला स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि समानतेची जाणीव मिळते. विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळत आहे, ही बाबासाहेबांच्या स्वप्नांचा एक भाग आहे. या शिष्यवृत्ती तरुणांना जागतिक स्तरावर ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करण्याची संधी देतात. यामुळे विद्यार्थी आपल्या समाजाला आणि देशाला नव्या उंचीवर नेऊ शकतात.

कुंभार पिंपळगांव ते ऑस्‍ट्रेलिया !

कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील प्रबुद्धराज पुरूषोत्‍तम गायकवाड याने आपल्‍या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्‍या बळावर थेट ऑस्‍ट्रेलियातील उच्‍च शिक्षणासाठी प्रवेश मिळवून गावाचे, जिल्‍ह्याचे आणि राज्‍याचे नाव उज्‍जवल करण्‍याच्‍या दृष्‍टीने महत्‍वाचे पाऊल टाकले आहे. महाराष्‍ट्र शासनाद्वारे अल्‍पसंख्‍याक समाजासाठी असलेल्‍या परदेशी शिष्‍यवृत्‍ती योजने अंतर्गत प्रबुद्धराज गायकवाड याची उच्‍च शिक्षणासाठी निवड झाली असून तो नुकताच ऑस्‍ट्रेलियात शिक्षणासाठी दाखल झाला आहे.

उच्‍च शिक्षणासाठी परदेशात

प्रबुद्धराज ऑस्‍ट्रेलिया येथे Master of Professional Engineering, Civil Engineering (structurer) या पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठी आस्‍ट्रेलियात दाखल झाला आहे. ही बाब समाजासह संपूर्ण गावासाठी, जिल्‍ह्यासाठी आणि राज्‍यासाठी सुध्‍दा अभिमानाची बाब आहे. प्राप्‍त माहितीनुसार जालना जिल्‍ह्यातून प्रबुद्धराज गायकवाड या एकमेव विद्यार्थ्‍याची या वर्षात सदरील शिक्षणासाठी निवड झाली आहे.

प्रबुद्धराज याचे शिक्षण

प्रबुद्धराज याचे प्राथमिक शिक्षण जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, नुतन वसाहत कुंभार पिंपळगांव येथे झाले, इयत्‍ता ५ वी ते १० पर्यंत शिक्षण सरस्‍वती भूवन विद्यालय येथे झाले, तसेच ११ वी ते १२ पर्यंत शिक्षण आणि त्‍यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग (बी.टेक) हे देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे झाले. त्‍यानंतर त्‍याने GATE परीक्षा क्‍वालिफाय केली. आता तो PG – Master of Professional Engineering – Civil Engineering (structure) या पदव्‍युत्‍तर पदवीसाठी ऑस्‍ट्रेलिया येथे गेला आहे. तत्‍पूर्वी त्‍याने इंग्रजी भाषा कौशल्‍य टेस्‍ट दिली होती.

शैक्षणिक खडतर प्रवास

प्रबुद्धराज गायकवाड याचा शैक्षणिक प्रवास सहज नव्‍हता. मर्यादित साधनसंपत्‍ती, ग्रामीण भागातील शैक्षणिक व इतर अडचणी असूनही त्‍याने आपल्‍या ध्‍येयावर लक्ष केंद्रीत केले, अभ्‍यासात सातत्‍य ठेवले. त्‍याच्‍या यशामागे केवळ जिद्द नव्‍हे तर शिक्षक, मार्गदर्शक आणि सर्वात महत्‍वाचे म्‍हणजे कुटुंबियांची मोठ्या प्रमाणात साथ लाभली. प्रबुद्धराज हा कुंभार पिंपळगांव येथील पुरूषोत्‍तम गायकवाड (पेंटर) यांचा मुलगा आहे.

स्‍वप्‍नांना आकाश

प्रबुद्धराज गायकवाड याने कुटुंबाची आर्थिक स्थिती सशक्‍त नसतांना कधी हार मानली नाही. अभ्‍यासात सातत्‍य, मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्‍नांमुळे त्‍याची शिष्‍यवृत्‍तीसाठी निवड झाली. सदरील शिष्‍यवृत्‍ती योजना म्‍हणजे आर्थिक दृष्‍ट्या मागास आणि अल्‍पसंख्‍याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्‍यांसाठी एक नवे दार उघडणारी सुवर्णसंधी म्‍हणावी लागेल. महाराष्‍ट्र शासन राबवत असलेली ही योजना अशा विद्यार्थ्‍यांच्‍या स्‍वप्‍नांना आकाश देणारी ठरत आहे.

प्रबुद्धराज गायकवाड हा ऑस्‍ट्रेलियात फक्‍त शिक्षण घेत नाही तर आपल्‍या देशाची मान सुध्‍दा उंचावत आहे. भविष्‍यात त्‍याच्‍याकडून देशासाठी, समाजासाठी आणि तंत्रज्ञानाच्‍या क्षेत्रात मोठे योगदान होईल असा विश्‍वास बाळगायला हरकत नाही. त्‍याच्‍या या यशामुळे इतर विद्यार्थ्‍यांनाही प्रेरणा मिळेल आणि अल्‍पसंख्‍याक समाजातील युवकही शिक्षणाकडे आकर्षित होतील. प्रबुद्धराज गायकवाड यास मिळालेले यश म्‍हणजे संकटांना सामोरं जाण्‍याची तयारी आणि योग्‍य मार्गदर्शन असेल तर कुठलंच स्‍वप्‍न अशक्‍य नाही याचं जिवंत उदाहरण आहे.

अभिनंदनाचा वर्षाव

प्रबुद्धराज याची ऑस्‍ट्रेलिया येथील उच्‍च शिक्षणासाठी निवड झाल्‍याबद्दल वडील पुरूषोत्‍तम गायकवाड, चुलते तुकाराम गायकवाड, मनोहर गायकवाड, अनिल गायकवाड तसेच कुटुंबातील सर्व सदस्‍य, नातेवाईक, पाहुणे यांच्‍यासह मित्र परिवाराच्‍या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्‍छा देण्‍यात आल्‍या आहेत.



व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!