एल्गार न्यूज :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष शंकर लक्ष्मण कंटुले (वय अंदाजे ३४) यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, १ मुलगा, आई, भाऊ, भावजय, बहीण असा परिवार आहे.
शंकर कंटुले हे मुलीच्या वाढदिवसानिमित्त कुंभार पिंपळगांवहून अंबडच्या दिशेने दुचाकीवरून पाहुण्याकडे जात होते, मात्र समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला खूप मार लागला होता, त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले, परंतू दि.१२ रोजी उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.
शांत संयमी स्वभाव !
स्व.शंकर कंटुले हे अत्यंत शांत, संयमी स्वभावाचे होते, व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी चांगली प्रगती केली होती. कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवाजी कंटुले हे त्यांचे मोठे बंधू होत. काही वर्षापूर्वी वडीलांच्या निधनानंतर दोन्ही भावांनी कुटुंबाला सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करत प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली होती. शंकर कंटुले यांचे तरूण वयातच दुर्दैवाने निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.