Your Alt Text

फळ पीक विम्‍याचे अर्ज भरण्‍यासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ ! संधीचा लाभ घेण्‍याचे आवाहन !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
फळ पीक विमा भरण्‍यासाठी शेवटच्‍या दिवसांमध्‍ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्‍याने अनेक शेतकरी विम्‍याचे अर्ज भरण्‍यापासून वंचित राहिले होते, मात्र आता शासनाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून विमा (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) भरण्‍यासाठी मुदतवाढ दिली आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, हवामान आधारित फळ पिक विमा योजने मध्‍ये मृग बहार २०२५ मध्‍ये द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू, मोसंबी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्‍यासाठी अंतिम दिनांक ३० जून २०२५ होती.

दिनांक २७ जून पासून आधार संकेत स्‍थळ बाबत समस्‍या असल्‍याने विमा अर्ज करण्‍यामध्‍ये अडचणी येत होत्‍या, अर्थातच शेवटच्‍या दिवसांमध्‍ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्‍याने अनेक शेतकरी विमा भरण्‍यापासून वंचित राहिले होते. याचा विचार करून केंद्र शासनाने दिनांक ३ जुलै २०२५ ते ६ जुलै २०२५ असे ४ दिवस सदरील पिकांसाठी फळ पिक विमा योजनेत भाग घेण्‍यासाठी मुदतवाढ दिली आहे.

कागदपत्रांची आवश्‍यकता !

फळ पिक विम्‍याचे अर्ज ऑनलाईन भरण्‍यासाठी आधारकार्ड, बॅंक पासबुक, ७/१२, ८अ, ई-पीक पाहणी, फार्मर आयडी इत्‍यादी कागदपत्रे आवश्‍यक असल्‍याची माहिती एका महा ई सेवा केंद्र चालकाने दिली आहे.

संधीचा लाभ घेण्‍याचे आवाहन !

फळ पिक विमा योजनेत अर्ज करण्‍यासाठी शासनाने ३ ते ६ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली असून विमा भरण्‍यापासून वंचित राहिलेल्‍या पात्र शेतकऱ्यांनी तातडीने या विमा योजनेत भाग घ्‍यावा असे आवाहन घनसावंगीचे तालुका कृषि अधिकारी डॉ.सखाराम पवळ यांनी केले आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!