Your Alt Text

सापाच्‍या जोडीदाराला मारले तर तो मागे येतो का ? साप उडू शकतो का ? | Important Facts About Snakes

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Important Facts About Snakes : समाजामध्‍ये सापांबद्दल अनेक समज, गैरसम आढळून येतात, अनेकांना साप म्‍हटले की घाम फुटतो, सापाला नुसतं पाहीलं की माणूस पळायला लागतो, सापाबद्दल माणसाच्‍या मनामध्‍ये इतकी भिती असते की, साप चावल्‍यानंतर त्‍याच्‍या विषामुळे जितके मृत्‍यू होत नाही तेवढे नुसत्‍या भितीने मृत्‍यू होतात.

सापाच्‍या बाबतीत अनेकदा काही गैरसमज सुध्‍दा दिसून येतात, सापाबद्दल लोकांच्‍या मनात काही प्रश्‍न निर्माण होत असतात, त्‍या प्रश्‍नांची उत्‍तरे या आर्टीकल मध्‍ये देण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आलेला आहे. सदरील माहिती विविध माध्‍यमांमध्‍ये प्रकाशित झालेली आहे. त्‍यास अनुसरून येथे माहिती देण्‍यात येत आहे.

Important Facts About Snakes

  1. अनेकांचा असा समज असतो किंवा कथांमध्‍ये ऐकलेले असते की, जो साप 100 वर्षे जगतो त्‍याला इच्‍छेनुसार शरीर धारण करता येते, परंतू वास्‍तवात असे होत नाही, साप माणसांपासून खूप दूर राहतात, कारण माणूस आणि साप जर एकत्र राहीले तर दोघांपैकी फक्‍त एकच जगू शकतो हे देखील तेवढेच वास्‍तव आहे.
  2. साप अंडी घालतात आणि त्‍या अंड्यापासूनच सापांचा जन्‍म होतो हे खरे आहे. परंतू पूर्ण सत्‍य देखील नाही. कारण सापांच्‍या काही प्रजाती अंडी घालतात, तर बऱ्याच प्रजाती सस्‍तन प्राण्‍यांप्रमाणे थेट पिलांना जन्‍म देताता.
  3. काही चित्रपटांमध्‍ये असे दाखवले जाते की, काही दृष्‍यात साप कोणालातरी संमोहित करतो, परंतू वास्‍तवात असेही काहीच नसून सापामध्‍ये कुठल्‍याही प्रकारची संमोहित करण्‍याची शक्‍ती नसते.
  4. काही लोकांचा असाही समज असतो की, जेव्‍हा साप शंभर वर्षे जगतो तेव्‍हा त्‍याच्‍या डोक्‍यावर रत्‍न चमकायला लागतात, परंतू सर्प पकडणाऱ्यांच्‍या मते असे काही घडत नाही. हे केवळ काल्‍पनिक असल्‍याचे त्‍यांचे म्‍हणणे आहे.
  5. अनेकांना असे वाटते की, साप उडू शकतात, परंतू सापांमध्‍ये उडण्‍याची क्षमता नसते, हे खरे आहे की सापांचे शरीर फ्लेक्‍सीबल असल्‍यामुळे ते कित्‍येक मिटरपर्यंत उडी मारू शकतात उदाहरणार्थ एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारू शकतात, परंतू सापाला एखाद़्या पक्ष्‍या सारखे उडता येत नाही. अधिक माहिती खाली दिली आहे.

सापाच्‍या जोडीदाराला मारले तर तो मागे येतो का ? येथे क्लिक करा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!