Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana : शासनाने भुमिहीन लोकांना स्वत:ची जमीन घेता यावी, त्यांचे आयुष्य सुकर व्हावे या उद्देशाने एक महत्वाची योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत संबंधित लाभार्थ्याला जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान मिळणार आहे.
शासन वेळोवेळी समाजातील विविध घटकांसाठी योजना सुरू करत असते, विविध योजनांच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल व्हावे, त्यांचे सामाजिक, कौटुंबिक व आर्थिक पातळीवर जीवन सुकर व्हावे असा शासनाचा प्रयत्न असतो.
भारत हा कृषिप्रधान देश आहे, बहुसंख्य लोकसंख्या ही शेतीवर आणि शेतीशी संबंधित उद्योगांवर अवलंबून आहे. परंतू अनेकजण असे आहेत ज्यांच्याकडे शेतीच नाही, त्यांना इतरांच्या शेतात जावून मजुरी करावी लागते आणि स्वत:चा उदरनिर्वाह करावा लागतो.
अनेक भुमिहीन लोकांचे स्वप्न असते की आपलीही स्वत:ची जमीन असावी, परंतू जमीनीचे वाढलेले दर पाहता सर्वसामान्य व्यक्तीला इच्छा असूनही शेती खरेदी करता येत नाही. हीच बाब लक्षात घेवून शासनाने काही घटकांकरीता एक योजना सुरू केली असून त्यांना आता 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
यापूर्वी अनुदानाची रक्कम कमी होती, ज्यामुळे अनेकांना उर्वरित पैसे टाकणेही शक्य नव्हते, मात्र आता शासनाने अनुदानाची रक्कम 100 टक्के केली आहे, सदरील योजनेचे नाव कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना असे आहे.
Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana
सदरील योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्याला कोरडवाहू जमीन असेल तर 4 एकरसाठी 20 लाख पर्यंत अनुदान दिले जाते, तसेच जमीन बागायत असेल तर दोन एकर जमिनीसाठी 16 लाख पर्यंत अनुदान दिले जाते. म्हणजेच कोरडवाहूसाठी 5 लाख प्रति एकर प्रमाणे 4 एकरसाठी 20 लाख आणि बागायती जमिनीसाठी 8 लाख रूपये एकर प्रमाणे 2 एकरसाठी 16 लाख या प्रमाणे अनुदान देण्यात येते.
मात्र ही योजना सर्वांसाठी नसून काही घटकांसाठीच आहे. कोणत्या घटकांसाठी किंवा लोकांना हे अनुदान मिळणार आहे या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…