एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्ह्यातील विविध तालुक्यात अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती मध्ये काही महसूल मंडळात चक्री स्वरूपाचे वारे येवून गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील विविध भागातील मंडळातील फळपीक ज्या मध्ये मोहोर लागून असलेली व फळ लागलेली व तोडणीस आलेली या सर्व प्रकारच्या फळांची प्रचंड प्रमाणात नुकसान होवून ती खाली पडली तसेच त्रनमूळ वर्गीय पिके व काही बियाणे च्या निर्मितीच्या उद्देशाने उत्पादित लागवड केली जाणारी पिके यांची प्रचंड नुकसान झाली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळाचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत, नुकसान झालेल्या पिकाच्या आज जागतिक बाजार मुल्याच्या उत्पन्न व भावानुसार नुकसान भरपाईचे निकष ठरवून ती भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी.
सदरील नुकसान भरपाई NDRF च्या नुकसान भरपाई चे निकष लावून देण्यात येवू नये, एका आर्थिक वर्षात किंवा महसूली वर्षात दोनदा पंचनामे करण्याचे निकष हे दोन मोहोर असलेल्या फळवर्गीय व बहुवार्षिक व बीज निर्मिती पिकाच्या अटीशर्ती रद्द करण्यात येवून ती भरपाई देण्यात यावी, यासाठी राज्य व केंद्र शासन यातील कृषी मंत्रालयाकडे मदत व पुनर्वसन विभागाकडे येत्या ७ दिवसात तो नुकसान भरपाईचा अहवाल पाठवून सहकार्य करावे अशी मागणी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे करण्यात आली आहे.
७ दिवसात मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील दिवसापासून जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येतील असा इशारा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते गजानन उगले, अर्जुन देवडकर, भागवत एसलोटे, दादाराव काळे, अंकुशराव कांबळे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रति केंद्र आणि राज्य शासनाचे विविध मंत्री आणि संबंधित विभागांना पाठविण्यात येत आहेत.
एल्गार न्यूज युट्यूब चॅनलचे पुढील रोखठोक व्हिडीओ प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करून Subscribe करा.
