Your Alt Text

पेट्रोलवरील खर्च अर्धा होणार ! गॅसवर चालणारी बाईक येणार ! | Bajaj CNG Bike

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Bajaj CNG Bike : आपण पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहने पाहीली आहेत, आपणास आश्‍चर्य वाटेल परंतू आता थेट गॅसवर धावणारी बाईक येणार आहे. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे वाढते दर लक्षात घेता वाहनप्रेमी इतर पर्यायांचा शोधत घेत आहेत. त्‍यातच आता कमी खर्चात गॅसवर धावणारी बाईक येणार आहे.

आपणास आश्‍चर्य वाटेल परंतू येत्‍या काळात बाईकसाठी पेट्रोलची आवश्‍यकता भासणार नाही, कारण सीएनजी वर धावणारी बाईक मार्केट मध्‍ये येणार आहे. यामुळे पेट्रोलवरील खर्च जवळपास 50 टक्‍के कमी होणार आहे.

असे नाही की, सीएनजी वर धावणारी वाहने नाहीत, यापूर्वीच तीन चाकी व चार चाकी वाहनांमध्‍ये सीएनजी वापरला जातो, त्‍यामुळे पेट्रोल डिझेलच्‍या तुलनेत याचा खर्च जवळपास अध्‍याने कमी होतो. शिवाय पेट्रोल डिझेलच्‍या तुलनेत सीएनजी मुळे जास्‍त मायलेज मिळते.

गेल्‍या काही कालावधीपासून जगातील बहुसंख्‍य देशांनी पेट्रोल आणि डिझेलवरील निर्भरता कमी करण्‍याकडे वाटचाल सुरू केली आहे. पर्यायी इंधनासाठी सर्वच देश आग्रही असल्‍याचे दिसून येत आहे. आपल्‍या देशातही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

CNG / LPG Bike

एवढंच नव्‍हे तर इथेनॉलवर सुध्‍दा धावणारी वाहने मार्केट मध्‍ये येणार आहेत, अर्थात एका कंपनीने तर इथेनॉलवर धावणारी कार सुध्‍दा लॉन्‍च केली आहे. मात्र आता त्‍यापुढेही जावून एक कंपनी LPG आणि CNG वर धावणाऱ्या बाईक मार्केट मध्‍ये उतरवण्‍याच्‍या तयारीत आहे.

म्‍हण्‍जेच लवकरच आपल्‍याला एलपीजी किंवा सीएनजी गॅसवर धावणाऱ्या बाईक किंवा मोटारसायकल मार्केट मध्‍ये धावतांना दिसल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही. त्‍यामुळे पेट्रोलवरील खर्च जवळपास अर्धा होण्‍याची शक्‍यता आहे.

Bajaj CNG Bike

भारतातच नव्‍हे तर जगात प्रसिध्‍द असलेली भारतीय कंपनी बजाजने यासाठी पुढाकार घेतला आहे, लवकरच बजाजची गॅसवर धावणारी बाईक मार्केट मध्‍ये येणार आहे. वाढते प्रदुषण कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने सुध्‍दा सीएनजी वर धावणारी बाईक उपयोगी पडणार आहे. गॅसवर धावणारी बाईक कोणती आणि त्‍याची किंमत किती या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…

गॅसवर धावणारी कोणती बाईक येणार ? किंमत किती ? येथे क्लिक करा….

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!