एल्गार न्यूज :-
Animal Insurance for Just Three Rupees : सरकारने ज्या प्रमाणे एक रूपयात पिक विम्याची सुविधा उपलब्ध केली आहे त्याच धर्तीवर आता केवळ 3 रूपयात पशुधन विमा उतरवणार आहे. याचाच अर्थ पशुपालक शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.
प्राप्त माहितीनुसार 2019 च्या पशु गणनेनुसार राज्यात 62 लाख दुभत्या गाई – म्हशी असून 1 कोटी 43 लाख मे.टन वार्षिक दूध संकलन होते. राज्यात 53 लाख बैल, 75 लाख शेळ्या आणि 28 लाख मेंढ्या आहेत. सदरील पशुधनाचे स्थूल मुल्य 93 हजार 169 कोटी रूपये आहे.
राज्यात कृषि विभागाची ज्या प्रमाणे फक्त 1 रूपयात पीक विमा योजना आहे, त्याच धर्तीवर जनावरांया विम्याबाबत सुध्दा निर्णय घेण्यात येणार आहे. अघ्या 3 रूपयात पशुधन विमा उतरवला जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Animal Insurance for Just Three Rupees
राज्यात मागील काही महिन्यांपासून लम्पी या रोगाने पशुपालकांची झोप उडवली आहे. लम्पी सारख्या आजारामुळे जनावरांचा मृत्यू होवून पशुपालक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते, त्यामुळे जर जनावरांचा विमा उतरवण्यात आल्यास पशुपालक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे शक्य होणार आहे.
राज्यात यापूर्वी पशुधन विमा योजना राबविली जात होती, मात्र या योजनेला मर्यादा असल्याचे अनेक पशुपालक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकार अवघ्या 3 रूपयात पशुधन विमा योजना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कळते. याबाबत अधिकृत अशी घोषणा झालेली नाही, मात्र संबंधित मंत्री यांनी याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे सांगितले.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
नियमित रोखठोक, निष्पक्ष व निर्भीड बातम्या व आर्टीकल आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.