Your Alt Text

स्‍वामी विवेकानंद पब्लिक स्‍कुलचा वार्षिक स्‍नेहसंमेलन उत्‍साहात संपन्‍न..

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथील स्‍वामी विवेकानंद पब्लिक स्‍कूलचा वार्षिक स्‍नेहसंमेलनाचा कार्यक्रम सोमवार दि.१० रोजी अतिशय आनंदात व उत्‍साहात पार पडला.

याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, सरपंच सौ.संगीता गंगाधर लोंढे, शाळेच्‍या अध्यक्षा ॲड. सौ.किर्तीताई श्यामसुंदर उढाण (माजी जिल्हा परिषद अध्‍यक्ष, जालना), श्यामनाना उढाण (माजी जिल्हा परिषद सदस्य जालना व संस्थापक अध्‍यक्ष स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल, कुं.पिंपळगाव) ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्ते गंगाधर लोंढे, शिवसेना ता.प्रमुख बापुसाहेब आर्दड, माजी उपसरपंच अंकुशराव रोकडे, ग्रामपंचायत सदस्‍य रफिक कुरेशी, भगवानराव शिंदे, आप्‍पासाहेब कंटुले, सिंदखेडचे सरपंच बालासाहेब पांढरे, सामाजिक कार्यकर्ते सोनाजी कंटुले, राज घोगरे, राजु घोगरे, रामेश्‍वर तौर, बंडू हांडे, अशोकराव तौर, यांच्‍यासह अनेक मान्‍यवरांची उपस्थित होती.

Aanula Gatheri Swami Vivekanand Public School

माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी स्‍वामी विवेकानंद पब्लिक स्‍कुलला काहीही सहकार्य लागल्‍यास किंवा शासनाकडे शैक्षणिक दृष्‍ट्या काही पाठवुरावा करणे आवश्‍यक असल्‍यास त्‍याबाबतही सहकार्य करू असे सांगितले.

स्‍नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडण्‍याची जबाबदारी प्रेमप्रकाश बांगर व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व मुख्याध्यापक या सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडली. यावेळी विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या कला गुणांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच कुंभार पिंपळगांवसह परिसरातील पालक व नागरिकांची मोठ्या संख्‍येने उपस्थिती होती.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!