एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवाशी असलेले सामाजिक कार्यकर्ते अनुरथ नाथाजी गाढे यांचे दि.7 रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. कुंभार पिंपळगांवसह तालुक्यात ते चाचू या नावाने सुध्दा परिचित होते. वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. माजी उपसरपंच मनोहर गाढे,अॅड.प्रदीप गाढे, विलास गाढे, सिद्धार्थ गाढे, पत्रकार अजय गाढे, यांचे ते चुलते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी सह मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गाढे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अनेक कुटुंबांचा आधार !
अनुरथ (चाचू) गाढे हे स्वत:च्या परिवाराचा आधार तर होतेच, परंतू भाऊ, बहीण व इतर नातेवाईक अशा अनेकांचे सुध्दा ते आधार होते. त्यांनी अनेकांना एखाद्या कुटुंब प्रमुखा प्रमाणे आधार देण्याचा प्रयत्न केला व आपल्या पायावर उभं राहण्यासाठी सहकार्य केले. सर्वसामान्य नागरिकांना सुध्दा ते विविध कामासाठी सहकार्य करत होते व मार्गदर्शन करत होते. त्यांच्या निधनाने कुटुंब व मित्र परिवारासह अनेकांना मोठा धक्का बसला आहे.