एल्गार न्यूज :-
Rivot NX100 Electric Scooter : दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. पेट्रोल – डिझेलचे वाढते दर लक्षात घेता अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित होवू लागले आहे. कारण इलेक्ट्रिक वाहनांना वारंवार चार्ज करून आपण वापरू शकतो.
सध्या असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये एक अडचण दिसून येते ती म्हणजे त्यांची कमी रेंज, म्हणजेच एकदा चार्ज केल्यावर 50 ते 100 किमी चालतात, परंतू सध्या आपण ज्या इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल माहिती घेत आहोत ती तब्बल 280 कि.मी. धावणार आहे.
Rivot NX100 Electric Scooter
सदरील इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव Rivot NX100 असे असून या स्कूटरचे दूसरे एक प्रमुख वैशिषट्ये म्हणजे या मध्ये मागे व पुढे कॅमेरा देण्यात आलेला आहे. ज्याची माहिती डिस्प्ले वर दिसून येते. यामुळे ही स्कूटर इतर स्कूटरपेक्षा वेगळी दिसून येते.
सदरील स्कूटर मध्ये जास्त क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली असून ही बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी फक्त 3 तास लागत असल्याचे सांगण्यात आले आहे. एकदा चार्ज केल्यावर ही स्कूटर 280 कि.मी. पर्यंत धावू शकते अशी माहिती माध्यमांमध्ये प्रकाशित झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार या स्कूटरची टॉप स्पीड 120 km/Hr राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या स्कूटर मध्ये लिथीयम बॅटरी वापरण्यात आल्यामुळे या स्कूटरची रेंज वाढणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये एलईडी लाईट, एलईडी इंडिकेटर, डिस्प्ले व इतर आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. अधिक माहिती खाली दिली आहे.