एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी जालना येथील नामांकित ‘ओजस’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दि.20 रोजी सदिच्छा भेट दिली.
अजित पवार यांच्या जालना शहरातील विविध कार्यक्रमाच्या नियोजित दौऱ्यामध्ये ‘ओजस’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे सदिच्छा भेट देणे नियोजित होते. त्या प्रमाणे त्यांनी या ‘ओजस’ हॉस्पिटलला भेट दिली आहे. भेटी दरम्यान अजित पवार यांनी ‘ओजस’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.क्रांतिसिंह लाखे पाटील, डॉ. सूरजसिंह रविंद्र तौर, डॉ. रविंद्र थोरात, यांचे सोबत हॉस्पिटल मधील शासकीय योजना, विविध उपक्रम व सोई- सुविधा बाबत माहिती घेऊन आपल्या हातून होत असलेल्या रुग्णसेवेबाबत कौतुक केले व उत्तम प्रकारे हॉस्पिटल शहरात सुरु असल्याबाबत समाधानही व्यक्त केले.
या प्रसंगी भेटी दरम्यान विधान परिषद सदस्य विक्रम काळे, घनसावंगी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.हिकमत उढाण, विधानपरिषद सदस्य सतीष चव्हाण, अंबड – बदनापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नारायण कुचे, सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रविंद्र तौर, शिवाजीराव बनकर, रशीद पहेलवान, सौ.वंदना खांडेभराड, बाळासाहेब तनपुरे, घनसावंगी कृषी उत्पन्न समितीच्या संचालिका सौ.किरणताई रविंद्र तौर, ‘ओजस’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.क्रांतिसिंह लाखे पाटील, डॉ. सूरजसिंह रविंद्र तौर, डॉ. रविंद्र थोरात, ॲड. सौ. रेश्मा लाखे व डॉ.साधना थोरात यांची उपस्थिती होती.